Himachal Pradesh Election : आम आदमी पार्टी हिमाचलमध्ये सर्वच जागा लढवणार, 10 उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने आपली तिसरी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 10 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
Himachal Pradesh Election 2022 : हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीच्या (Himachal Pradesh Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपसह काँग्रेसनं उमेदवारांच्या नावांची घोषणा देखील केली आहे. या निवडणुकीत आम आदमी पार्टी (Aam Aadmi Party) देखील मैदानात उतरली आहे. आम आदमी पार्टीने या निवडणुकीसाठी आपली तिसरी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये 10 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे.
हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रथम 62 उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर गुरुवारी भाजपनं दुसरी त्यांची सहा उमेदवारांची यादी जाहीर केली. आता आम आदमी पार्टीनेही त्यांच्या 10 उमेदवारांच्या नावांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीसोबतच आप ने हिमाचल प्रदेशातील सर्व 68 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. आपसमोर काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचे मोठं आव्हान असणार आहे.
भाजपनेही उमेदवारांची यादी जाहीर केली
आगामी हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी सहा उमेदवारांची दुसरी आणि अंतिम यादी जाहीर केली. पक्षाने यापूर्वी 62 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. या यादीसह भाजपने राज्यातील सर्व 68 विधानसभा जागांसाठी आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत.
BIG NEWS‼️
— AAP (@AamAadmiParty) October 20, 2022
We hereby announce our 3rd List of Candidates for Himachal Pradesh Assembly Elections, 2022.
Congratulations to all the candidates 💐
People of Himachal are waiting to give “One Chance to Kejriwal” pic.twitter.com/lhjwOy9VNN
काँग्रेसने 46 उमेदवारांची यादी जाहीर केली
हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने 18 ऑक्टोबर रोजी 46 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मुलगा विक्रमादित्य सिंग आणि विधिमंडळ पक्षाचे नेते मुकेश अग्निहोत्री यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेत्यांचा समावेश आहे. पक्षानं जाहीर केलेल्या यादीनुसार, विक्रमादित्य सिंह यांना त्यांच्या सध्याच्या सिमला ग्रामीणमधून पुन्हा एकदा तिकीट देण्यात आलं आहे. त्याचवेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते मुकेश अग्निहोत्री यांना त्यांच्या सध्याच्या विधानसभा मतदारसंघ हरोलीमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
कसा असेल हिमाचल प्रदेशमधील निवडणुकीचा कार्यक्रम
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission Of India) हिमचाल विधानसभा निवडणुकीची (Himachal Pradesh Election) घोषणा केली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभेची निवडणूक एकाच टप्यात होणार आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर आहे तर 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. 8 डिसेंबर रोजी हिमाचल प्रदेशमध्ये कुणाचं सरकार होणार हे स्पष्ट होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या: