एक्स्प्लोर

मुंबई काँग्रेसच्या परिस्थितीमुळे निवडणूक लढण्याचा पुनर्विचार : देवरा

'मुंबई काँग्रेसमधील घडामोडींमुळे मी नाराज आहे. लोकसभा निवडणुका लढवण्याबाबत माझा पवित्रा पक्षाला माहित आहे. केंद्रीय नेतृत्व आणि पक्षाच्या तत्त्वनिष्ठेवर माझा पूर्ण विश्वास आहे' असंही मिलिंद देवरांनी पुढे म्हटलं आहे.

मुंबई : मुंबई काँग्रेसमधील घडामोडींमुळे नाराज असल्याच्या भावना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि दक्षिण मुंबईतील माजी खासदार मिलिंद देवरा यांनी व्यक्त केल्या आहेत. अशीच परिस्थिती राहिली, तर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल, असे संकेत मिलिंद देवरांनी ट्विटरवरुन दिले आहेत. 'पक्षांतर्गत गोष्टींबाबत जाहीर वाच्यता करण्याची इच्छा नाही, मात्र एका मुलाखतीत केलेल्या टिपण्णीमुळे मुंबईतील विविधतेचं प्रतीक म्हणून कायम राहण्यासाठी कटिबद्ध असलेल्या काँग्रेसबाबत आपली निष्ठा राखण्यासाठी या गोष्टींचा पुनरुच्चार करण्याशिवाय माझा इलाज नाही' असं मिलिंद देवरांनी एकामागून एक केलेल्या ट्वीट्समध्ये म्हटलं आहे. 'एकमेकांविरोधात लढणाऱ्या नेत्यांसाठी मुंबई काँग्रेस हे क्रिकेटचं मैदान होऊ शकत नाही.' अशा शब्दात देवरांनी संताप व्यक्त केला आहे. आर्थिक आणि सांस्कृतिक राजधानी असलेल्या मुंबईसारख्या शहरात नागरिकांना एकत्र आणण्याची गरज आहे, असंही देवरा म्हणतात. 'मुंबई काँग्रेसमधील घडामोडींमुळे मी नाराज आहे. लोकसभा निवडणुका लढवण्याबाबत माझा पवित्रा पक्षाला माहित आहे. केंद्रीय नेतृत्व आणि पक्षाच्या तत्त्वनिष्ठेवर माझा पूर्ण विश्वास आहे' असंही मिलिंद देवरांनी पुढे म्हटलं आहे. 'मुंबईतील काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी टीम म्हणून एकत्र यावं. आपण पक्ष आणि अध्यक्षांसाठी हे करुच शकतो' असं म्हणत देवरांनी ट्वीटमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना टॅग केलं आहे. अशीच परिस्थिती राहिली, तर लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत पुनर्विचार करावा लागेल आणि राजकारणातूनही निवृत्ती घ्यावी लागेल, असं देवरांनी सांगितलं. आपल्या भावना राहुल गांधींकडे पोहचवल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. संजय निरुपम यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा आहे. त्यामुळे देवरा यांनी एकप्रकारे निरुपम यांच्या नेतृत्वावरच शंका उपस्थित केली आहे. यापूर्वीही निरुपम यांच्याविरोधात पक्षातून सूर उमटला होता. कृपाशंकर सिंह, नसीम खान यांच्या गटातून संजय निरुपम यांना कायमच विरोध होत आला आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय निर्णय घेतात, हे पाहणं उत्सुकतेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Amravati Teacher Constituency : अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
अमरावती शिक्षक मतदारसंघात महायुतीत वाद पेटला! वंचितच्या पाठिंब्यासाठी एकनाथ शिंदेंची मोठी खेळी; खास दूत 'राजगृहा'वर
Pune Teachers Constituency Election : दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
दोन ओएसडीच्या स्पर्धेत सचिन सानपांनी बाजी मारली आता शिंदेंनी सुद्धा पाठिंबा दिला, पुणे शिक्षकच्या लढाईतील कोण आहेत सचिन सानप?
Sachin Sanap: शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
शड्डू ठोकलेल्या मंगेश चिवटेंना माघार घ्यावी लागली, एकनाथ शिंदेंनी भाजप अधिकृत उमेदवाराच्या विरोधात जाहीर पाठिंबा सुद्धा दिला; सचिन सानप काय काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप
गोकुळच्या निवडणुकीत ठरावधारकांना यल्लमाचा भंडारा हातात देऊन शपथा घ्यायला लावण्याचा प्रकार? बेळगावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची तक्रार, ठरावधारकांना धाक दाखवल्याचा आरोप

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget