Kalyan Dombivli: कल्याण डोंबिवली महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर
Kalyan Dombivali Municipal Corporation: ओबीसी आरक्षणाशिवाय येत्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत.
Kalyan Dombivali Municipal Corporation: ओबीसी आरक्षणाशिवाय येत्या राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घ्या, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यानंतर आता निवडणूक आयोगाकडून त्यासंबंधी हालचाली सुरू झाल्या आहेत. अशातच आता निवडणूक आयोगाने राज्यातील 14 महापालिकाना निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश देत कार्यक्रम आखून दिला होता. या कार्यक्रमानुसार 17 मे पर्यत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याच्या आदेशाचे पालन करताना कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून 133 नगरसेवकासाठी 44 प्रभागात होणाऱ्या निवडणुकीची प्रभाग रचना 13 मे रोजी राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पालिकेच्या मुख्य कार्यालयासह प्रभाग समितीच्या सर्व कार्यालयात प्रभाग रचना आणि सिमारचनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमांच्या कलम 5 च्या तरतुदीखाली कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बाबतीत निवडावयाच्या सभासदांची संख्या 133 इतकी निश्चित करण्यात आली आहे. नवीन प्रभाग रचना पाहण्यासाठी या https://kdmcelection.com/pdf/tajya_ghadyamodi/Annexure_2_Marathi_2022_Antim.pdf लिंकवर क्लिक करा.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील महापालिकांच्या निवडणुका घेण्यासाठी दिलेल्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने न्यायालयात एक अर्ज दाखल केला आहे. या अर्जात महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या, अशी विनंती करण्यात आली आहे. याचीच दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने त्यावर सुनावणीसाठी 17 मे दुपारी दोन वाजताची वेळ निश्चित केली आहे. आता या अर्जावर न्यायालय काय निर्णय देणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- New Chief Election Commissioner: भारताचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून राजीव कुमार यांची नियुक्ती
- मुदत संपण्याआधी निवडणुका घेणं हे निवडणूक आयोगाचं घटनात्मक काम : माजी निवडणूक आयुक्त जे एस सहारिया
- Sambhajiraje Chhatrapati : 'स्वराज्य' संघटना अन् राज्यसभेची अपक्ष निवडणूक, संभाजीराजेंच्या पत्रकार परिषदेतील दहा महत्वाचे मुद्दे