(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rakesh Tikait News : भाजप मतमोजणीत हेराफेरी करण्याची शक्यता, राकेश टिकैत यांचा आरोप
यूपीमध्ये सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या (7 मार्च) पार पडणार आहे. या मतदानापूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
Rakesh Tikait News : उत्तर प्रदेशमध्ये सहा टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. सातव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया उद्या (7 मार्च) पार पडणार आहे. या मतदानापूर्वी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजप मतमोजणीत हेराफेरी करुन निवडणुकीत पराभूत होणाऱ्या उमेदवारांना विजयी करु शकते असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. जवळपास 70 जागांवर हारलेल्या उमेदवारांना भाजप विजयी करु शकते असे टिकैत म्हणालेत. मतदानानंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्या आहेत, त्या ठिकाणी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
मतमोजणीत भाजप अफरातफर करण्याचा संशय राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे. तसेच अप्रामाणिकपणाच्या माध्यमातून उत्तर प्रदेशात किमान 70 जागा जिंकण्याची भाजपची तयारी सुरु असल्याची भीती टिकैत यांनी व्यक्त केली. त्यांनी शेतकरी आणि इतर मतदारांना मतमोजणीच्या एक रात्र आधी मतमोजणी ठिकाणाभोवती जमा होण्याचे आवाहन केले आहे.
येत्या 10 मार्चला पाच रज्यातील मतमोजणी होणार आहे. मतमोजणीत मोठ्या प्रमाणात अप्रामाणिकता होण्याची भीती राकेश टिकैत यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मतमोजणी होण्याच्या आदल्या दिवशी मतदारांनी आणि शेतकऱ्यांनी सावध राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. अफरातफर करुन उमेदवार विजयी करण्याची जबाबदारी एका उमेदवारावर देण्यात आली असल्याचा आरोपही यावेळी टिकैत यांनी केला. त्यामुळे संपूर्ण राज्यात किमान 70 उमेदवार अप्रामाणिकपणे विजयी होण्याची शक्यता असल्याचे टिकैत म्हणाले.
दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभेची निवडणूक 7 टप्प्यात होत आहे. आतापर्यंत 6 टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तसेच पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यातील मतदान प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. तसेच पाच राज्यांचा विधानसभा निवडणुकांसाठी सुरु असलेला प्रचार थांबला आहे. उत्तर प्रदेशमध्ये सातव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठी सोमवारी 7 मार्चला मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी सर्व टप्प्यातील मतमोजणी एकाच वेळी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- UP Election : यूपीमध्ये उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान, योगी सरकारमधील 7 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
- Weather Update : उत्तर भारतात ढगाळ वातावरण, तर 7 ते 9 मार्चदरम्यान महाराष्ट्रात पावसाची शक्यता
- Taliban on Indian Wheat: भारताचा गहू उत्तम प्रतिचा तर पकिस्तानचा निकृष्ट दर्जाचा, तालिबानी अधिकाऱ्यांची माहिती