Gold Rate : सोन्याच्या दरातील तेजीला ब्रेक, सोन्याचा भाव किती रुपयांवर पोहोचला, 24 कॅरेट, 22 कॅरेटचे नवे दर जाणून घ्या
Gold Rate Down : जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. सर्राफा बाजारात आणि एमसीएक्सवर सोन्याचे दर घसरले.

Gold Rate Update मुंबई : सोन्याच्या दरात गेल्या आठवड्यात तेजी आणि घसरण पाहायला मिळाली. कधी सोन्याचे दर वाढले तर कधी सोन्याच्या दरात घसरण झाली. या घडामोडींनतर आठवड्यात सोन्याचे दर घसरले आहेत. मात्र, सोन्याच्या दरातील घसरणीचा वेग कमी झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज आणि देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर घसरले आहेत. सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 24, 22, 20 आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेणं आवश्यक आहे.
गेल्या आठवड्यात सोन्याच्या दरात मोठे बदल झाले. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर 5 डिसेंबरच्यावायद्याच्या दर शुक्रवारी 224 रुपयांनी कमी होऊन 121284 रुपये 10 ग्रॅम होते. शुक्रवारी सोन्याचे दर 122325 रुपयांपर्यंत पोहोचले होते. 24 ऑक्टोबरला 10 ग्रॅम सोन्याचे दर 123451 रुपयांवर होते. त्या हिशोबानं सोन्याचे दर 2167 रुपयांनी घसरले आहेत.
मल्टी कमोडिटी एक्सचेंज प्रमाणं देशांतर्गत बाजारात देखील सोन्याचे दर कमी झाले आहेत. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाईटनुसार 24 ऑक्टोबरला 999 शुद्धता असणाऱ्या सोन्याचा दर 121518 रुपये होता. सोन्याचा दर शुक्रवारी म्हणजेच 31 ऑक्टोबरला 120770 रुपयांवर पोहोचला होता. म्हणजेच सोन्याचा दर 748 रुपयांनी कमी झाला आहे.
24 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 120770 रुपये इतका आहे. तर, 22 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 117870 रुपयांवर पोहोचला आहे. 20 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 107490 रुपये इतका आहे. 18 कॅरेट सोन्याचा दर 97820 रुपये इतका आहे. तर, 14 कॅरेट सोन्याचा एका तोळ्याचा दर 77900 इतका आहे.
आयबीजेएच्या वेबसाईटवर जारी केले जाणारे सोने आणि चांदीचे दर देशभर सारखे असतात. मात्र, सोन्याचे दागिने खरेदी करताना वेगवेगळ्या शहरात आकारला जाणारे मेकिंग चार्जेस आणि सोन्यावर लागू असलेली 3 टक्के जीएसटीचा समावेश केल्यानं सोन्याचे दर वाढतात.
सोन्याचे दर वर्षभरात मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तुम्हाला जर सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करायचे असतील तर त्याच्या गुणवत्तेबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. जे दागिने तुम्ही खरेदी करत आहात त्यावर हॉलमार्क अशतो. 24 कॅरेट सोन्यावर 999 अंक असतो. 22 कॅरेटवर 916, 18 कॅरेट सोन्यावर 750 लिहिलेलं असतं.
























