एक्स्प्लोर

UP Election : यूपीमध्ये उद्या शेवटच्या टप्प्यातील मतदान, योगी सरकारमधील 7 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

उद्या (7 मार्च) उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात 54 जागांवर मतदान होत असून, 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

UP Election 2022 : देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा प्रचार थांबला आहे. पाचपैकी पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या चार राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. तर उद्या (7 मार्च) उत्तर प्रदेशमध्ये शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. या टप्प्यात 54 जागांवर मतदान होत असून, 613 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या टप्प्यात नक्षलग्रस्त चकिया, दूधी आणि रॉबर्टसगंज जागांवरही मतदान होणार आहे. या जागांवर सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यामुळे या जागांवर मतदानाच्या 48 तास अगोदर शनिवारी दुपारी 4 वाजेपर्यंत निवडणूक प्रचार सुरू होता. इतर जागांवर सायंकाळी सहा वाजेपर्यंत निवडणूक प्रचार सुरु होता.

अंतिम फेरीत किती उमेदवार आणि किती मतदार आहेत

प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप, समाजवादी पार्टी, बसपा आणि काँग्रेसच्या दिग्गजांनी जोरदार प्रचार केला. सातव्या टप्प्यासाठी एकूण 2 कोटी 6 लाख मतदार आहेत. यामध्ये 1 कोटी 10 लाख पुरुष आणि 96 लाख महिला मतदार आहेत. या फेरीत 1 हजार 17 तृतीयपंथी मतदारही आहेत. हे मतदार 613 उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या फेरीत आझमगड, वाराणसी आणि विंध्याचल मंडलातील 9 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे. आझमगड, मऊ, जौनपूर, गाझीपूर, चंदौली, वाराणसी, चंदौली, मिर्झापूर, भदोही आणि सोनभद्र जिल्ह्यात मतदान होणार आहे. सातव्या टप्प्यात मतदान होणाऱ्या या 54 जागांपैकी 2017 च्या निवडणुकीत भाजपने 29 जागा  जिंकल्या होत्या. तर 11 जागा समाजवादी पार्टीने, 6 जागा बसपाने, आणि निषाद पार्टीने एक जागा जिंकली होती. 

योगी आदित्यनाथ सरकारमधील मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला 

या टप्प्यात योगी आदित्यनाथ सरकारच्या 7 मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यामध्ये मागासवर्गीय कल्याण मंत्री अनिल राजभर, मुद्रांक आणि नोंदणी राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) रवींद्र जैस्वाल, पर्यटन आणि सांस्कृतिक मंत्री (स्वतंत्र प्रभार) नीलकंठ तिवारी, गृहनिर्माण आणि नगर नियोजन मंत्री गिरीश यादव, ऊर्जा राज्यमंत्री रमाशंकर सिंह पटेल यांचा समावेश आहे. तसेच सहकार राज्यमंत्री संगीता यादव बळवंत, राज्यमंत्री संजीव गोंड सोनभद्र, वन व पर्यावरण विभागाचे कॅबिनेट मंत्री दारा सिंह चौहान यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

दुसरीकडे, दुर्गा प्रसाद यादव सलग 9 व्यांदा विधानसभेत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. ते आझमगड जागेवरून समाजवादी पार्टीचे उमेदवार आहेत. या टप्प्यात तीन उमेदवार सलग पाचव्यांदा विधानसभेत जाण्यासाठी निवडणूक लढवत आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपचा मित्रपक्ष असलेला सुहेलदेव भारतीय समाज पक्ष यावेळी समाजवादी पक्षासोबत आहे. सुभासपचे प्रमुख ओमप्रकाश राजभर हे गाझीपूरच्या जहूराबाद मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 

महत्त्वाच्या बातम्या:

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget