एक्स्प्लोर

Bacchu Kadu :कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!

Bacchu Kadu : राज्यभरात आमच्या आंदोलनाचं कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जातेय. आम्ही मॅनेज झालो असं बोलताय, लाज वाटत नाही का? अशा शब्दात बच्चू कडू यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

Bacchu Kadu : राज्यभरात आमच्या आंदोलनाचं (Farmer Protest) कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जातेय. आम्ही मॅनेज झालो असं बोलताय, लाज वाटत नाही का? शेतकरी आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) बंद करा, असे आमचे कार्यकर्ते म्हणतात. काहीजण मॅसेज करताय त्यांनी ते केल्यापेक्षा आंदोलनात सहभागी व्हा ना. आज आम्हाला आनंद आहे कर्जमाफीचा मुद्दा होता जो संपला होता, तो बच्चू कडूमुळे आज जिवंत झालाय. पण आमच्यावर कमेंट, आरोप आणि टीका करण्यापेक्षा गावा गावात आंदोलन उभं करा ना, अशा शब्दात खडेबोल सुनावत प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

Bacchu Kadu :  आम्ही मरायला पाहीजे असं काहींना वाटत होतं

आता 8वा वेतन लागू केला, का तर बिहार निवडणूक आहे म्हणून. आम्ही 27 पासून आंदोलन सुरू केलं. आम्ही मरायला पाहीजे असं काहींना वाटत होतं. अनेकांवर गुन्हे दाखल झालेत. माझ्यावर अनेक गुन्हे दाखल केले. कोर्टाचा आदेश आला तर आम्ही जेलभरो करायला सुरुवात केली. पण आमची परिस्थिती दाखवायला मीडिया कमी पडला. अशी खंतही बच्चू कडू यांनी बोलून दाखवली. राज्यात मराठयांचे आंदोलन झाले. ओबीसी आंदोलन झाले. मराठीच्या मुद्दयांवर मोर्चा झाला. हे भावनिक विषय आहे. शेतकऱ्याचा मुद्दा वेगळा आहे. बाकीच्यांची ताकद मोठी आहे. असेही ते म्हणाले.

Bacchu Kadu Farmer Protest : 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होणार, याला तारीख म्हणायच नाही का?

दरम्यान, 2020-21मध्ये कर्जमाफी झाली. दोन कर्जमाफी झाली ती थकीत कर्जदारांची झाली. नियमित वाल्यांची नाही. काल जर कर्जमाफी झाली असती तर शेतकऱ्यांचं नुकसान झाले असते. सक्तीची वसुली आणि वसुली यात फरक आहे. शासन निर्णय आहे की, वसुली थांबवा. जर वसुली केली तर बच्चू कडू ठोकणार. असा इशाराही बच्चू कडू यांनी यावेळी दिला. दुष्काळातले नियम लावले.

मुख्यमंत्री यांचं स्टेटमेंट नीट ऐका. आजही एकनाथ शिंदे म्हणाले की कर्जमाफी होणार. आमच्या आंदोलनाने कर्जमाफीची तारीख मिळाली की नाही? सगळे शेतकरी नेते होते. सगळ्यांवर आरोप करायला निघाले. घरून बसल्या बसल्या आरोप करणं सोपं आहे. 30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी होणार याला तारीख नाही म्हणायचं का? असा सवाल करत बच्चू कडू यांनी सडकून टीका केली.

Farmer Protest : सत्ताधाऱ्यांची बी टीम माझ्या मागे लागली आहे

आमचे सात ही नेते आंडूपांडू आहे का? 30 जून नंतर जर कर्जमाफी नाही झाली तर हंगामाँ होईल. जर कर्जमाफी झाली नाहीतर भाजपला निवडणुकीत मत मारू नका. सरकारने आज कर्जमाफी दिली असती तर, 15-20 कोटीत निपटलं असते. आता 30 जून असल्याने 45 कोटीच्या वरती आकडा जाईल.मग काय चुकलं.12 तारखेला अलिबाग याठिकाणी राज्यातील सगळ्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षांना बोलाविले आहे. दुसरीकडे सत्ताधाऱ्यांची बी टीम माझ्या मागे लागली आहे. माझं घर हवामहल आहे म्हणतात, या पाहायला एकदा आणि पहा. आमचे काय हाल झाले हे आम्हालाच माहीत आहे. असेही बच्चू कडू म्हणाले.

हे हि वाचा

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Delhi Blast: 'रुग्णालयाच्या माहितीनुसार आठ जणांचा मृत्यू', गृहमंत्री Amit Shah यांची माहिती
Delhi Blast: 'सर्व शक्यता तपासून बघणार', Amit Shah यांचा इशारा; NSG, FSL कडून तपास सुरू
Delhi Blast: 'आम्ही लहानपणापासून इथेच राहतो', लाल किल्ल्याजवळील स्फोटाने बेघर हादरले
Delhi Blast: 'उद्या सकाळीच बड्या अधिकाऱ्यांसोबत Meeting घेणार', स्फोटानंतर गृहमंत्री Amit Shah यांचा मोठा निर्णय
Delhi Blast: 'ब्लास्टचं कारण लवकरच कळेल', गृहमंत्री Amit Shah यांचा थेट संदेश, तपास यंत्रणांना आदेश

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Delhi Blast : लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
लाल किल्ला मेट्रो स्टेशन स्फोटानंतर राजधानी हादरली, संपूर्ण दिल्लीसह मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली हादरली! लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ मोठा स्फोट, कारमध्ये धमाका झाल्यानंतर हाय अलर्ट जारी
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
दिल्ली स्फोटानंतर अमित शाह माध्यमांसमोर, देशवासीयांना संबोधित करत म्हणाले, आय-20 कारमध्ये स्फोट
Delhi Blast : दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
दिल्ली हादरली, लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्टेशनजवळ स्फोट, आगीचे लोट, वाहनं चक्काचूर, 8 जणांचा मृत्यू
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
कुठल्याही परिस्थितीत मनसेसोबत जायचं नाही; बाळासाहेब थोरातांनी स्पष्टच सांगितलं, राष्ट्रवादीच्या आघाडीवरही बोलले
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Red Fort Blast: आयुष्यात एवढा मोठा धमाका ऐकला नाही, स्फोटानंतर मी तीनवेळा खाली पडलो; प्रत्यक्षदर्शीने सांगितला 'हादरा'
Delhi Blast : नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
नवी दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट, कोणत्या गाडीत स्फोट झाला? आतापर्यंत काय समोर आलं?
मोठी बातमी :  शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
मोठी बातमी : शीतल तेजवानी आणि दिग्विजय पाटीलवर 'त्या' प्रकरणात गैरसमजुतीने गुन्हे, पुणे पोलिसांचा अजब कारभार!
Embed widget