एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Leopard Attack: शिरूरमध्ये 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा उद्रेक, वनविभागाची गाडी पेटवली
पुण्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एका तेरा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याने तणाव निर्माण झाला आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, 'नरभक्षक बिबट्या जेव्हा पकडला जातो तेव्हा काही दिवस त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवून पुन्हा त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे हे हल्ले वाढतायत'. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाची गाडी आणि कार्यालय पेटवून दिले. तसेच, बेल्हे-जेजुरी महामार्गावर रास्तारोको आंदोलनही करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच याच भागात एका महिलेचाही बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता, त्यामुळे मानव आणि वन्यजीव संघर्ष अधिकच तीव्र झाला आहे.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















