एक्स्प्लोर

राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता, अशोक चव्हाणही राजीनाम्याच्या तयारीत

लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्यानंतर काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवावर चिंतन करण्यात येईल. सोबतच राहुल गांधी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील दारुण पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणीची आज बैठक होत आहे. या बैठकीत निवडणुकीतील पराभवावर चिंतन होणार आहे. तसंच निवडणुकीच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी राजीनामा देऊ शकतात. राहुल गांधी राजीनाम्यावर ठाम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत राहुल गांधी यांच्या राजीनाम्यावर चर्चा होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पी.चिदंबरम, सिद्धरामय्या, गुलाम नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे, कॅप्टन अमरिंदर सिंह, आरपीएन सिंह, मोतीलाल वोरा, केसी वेणुगोपाल यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते बैठकीला उपस्थित आहेत. पक्षाच्या स्थानिक नेत्यांचा राजीनामा लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर काँग्रेसच्या काही स्थानिक नेत्यांनी राजीनामा दिला. उत्तर प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी राहुल गांधीकडे आपला राजीनामा पाठवला. तर ओदिशामध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष निरंजन पटनायक यांनीही शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. अशोक चव्हाणही राजीनामा देणार महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणही पदावरुन पायउतार होण्याची शक्यता आहे. 2014 मध्ये मोदी लाटेतही अशोक चव्हाण यांनी नांदेडची जागा जिंकली होती. परंतु यंदाच्या निवडणुकीत चव्हाणांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परिणामी त्यांचा पराभव झाला. यामुळे चव्हाण राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचा केवळ 52 जागांवर विजय काँग्रेसला यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला. काँग्रेसला केवळ 52 जागाच मिळाल्या. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 44 जागा जिंकणाऱ्या काँग्रेसकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. या निवडणुकीत एकट्या भाजपला 303 जागांवर विजय मिळाला. तर एनडीएला 352 जागांवर यश मिळाला.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Vidhan Parishad Result 2026: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: नागपूर पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीत काँग्रेस अन् भाजपमध्ये नेट टू नेट फाईट; कराळे मास्तर गेमचेंजर ठरणार?
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
Nagpur MLC Election: नागपूर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या विरोधातील याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाचे महत्वपूर्ण निर्देश; याचिकेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना,कोर्टात नेमकं काय घडलं?
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीपूर्वीच वाद थेट कोर्ट कचेरीत पोहचला; याचिकेत आवश्यक सुधारणा करण्याच्या सूचना; तर निवडणूक आयोगसह राज्य निवडणूक यंत्रणेलाही निर्देश
Nagpur MLC Election Result 2026: 'पहिल्या फेरीत माझी 40 ते 45 हजार मतांची घोडदौड, नितेश कराळे गुरुजींचा विश्वास; विजयामागचं राज'कारण'ही सांगितलं!
'पहिल्या फेरीत माझी 40 ते 45 हजार मतांची घोडदौड, नितेश कराळे गुरुजींचा विश्वास; विजयामागचं राज'कारण'ही सांगितलं!

व्हिडीओ

Nitesh Karale Guruji On Win : अनपेक्षित निकाला लागण्याची शक्यता, कराळे गुरुजींना विजयाचा विश्वास
Ram Purnekar Detain Thane : रिक्षात डांबलं, रडू आवरेना... राम पूर्णकर पोलिसांच्या ताब्यात, काय घडलं?
Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pradeep Purnekar Death Case: बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
बसलेल्या उठल्या, पोलिसांसमोर उभ्या राहिल्या; प्रदीप पूर्णेकरांच्या पत्नीचा पोलीस स्थानकांत रौद्रावतार, राजन विचारेही बघत राहिले, नेमकं काय घडलं?
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
कुणीही असो वक्षतोडीला विरोधच; जैन मुनी निलेशचंद्रांचं राज ठाकरेंना समर्थन, म्हणाले, आंदोलनात सहभागी होईन
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
पुण्यातील मतमोजणीवर केंद्रावर मविआ अन् महायुतीचे कार्यकर्ते भिडले; जेवण आत आणण्यावरून गोंधळ, कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची, जेवणाचे बॉक्स घेताना राडा, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Farmers Loan Waiver: मोठी बातमी! दिवाळीपूर्वी 4 लाख 15 हजार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती; सरकारकडून चौथी यादी जाहीर
Pune Metro Line 3 : अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
अखेर मुहूर्त ठरला; पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'या' तारखेला होणार हिंजवडी मेट्रोचे उद्घाटन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
मन हेलावणारी घटना; न्यायालयाच्या कामानिमित्त शहरात गेले, भीषण अपघातात दोन चुलत भावांचा मृत्यू
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
Embed widget