एक्स्प्लोर

Eknath Shinde: फडणवीस सरकार 2.0 इज लोडिंग...एकनाथ शिंदेंच्या शपथविधीवर शिक्कामोर्तब, आझाद मैदानावर त्रिमूर्ती शपथ घेणार

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई: आज महायुतीचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. आज राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि एकनाथ शिंदे शपथ घेतील अशी चर्चा आज दिवसभर होती. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार की नाही याबाबात अनेक संभ्रम निर्माण झाले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार यावर आता शिक्कामोर्तब झालं आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार याबाबतचं पत्र राजभवनात देण्यात आलं आहे. शिवसेनेचा शिष्टमंडळ काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर पोहोचलं त्यानंतर त्यांनी राजभवनात राज्यपालांची भेट घेऊन एक पत्र दिलं आहे. त्या पत्रामध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) घेणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत शिवसेना नेते उदय सामंत यांनी देखील माहिती दिली आहे. 

राजभवनावरती पत्र देऊन बाहेर आल्यानंतर उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना ते म्हणाले, आज साडेपाच वाजता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे. आम्ही शिवसेनेच्यावतीने सर्व आमदारांनी, माजी मंत्र्यांनी, एकनाथ शिंदे यांना कळकळीची विनंती केलेली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये सरकारमध्ये त्यांनी उपमुख्यमंत्री पदी गेले पाहिजे, त्यांनी ज्या योजना सुरू केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भात काम करण्यासाठी देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील सरकारमध्ये असले पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका होती आणि मला सांगताना आनंद होत आहे, शिवसेनेचे सर्व आमदार आणि नेते महायुतीचे सर्व नेते, आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती केलेली होती. या सर्वांच्या विनंतीला आणि इच्छेला मान देऊन उपमुख्यमंत्री पद घेण्याचं एकनाथ शिंदे यांनी मान्य केलं आहे. त्यानंतर आम्ही सर्वजण देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, त्यांच्याकडून एकनाथ शिंदे यांच्या उपमुख्यमंत्री पदासाठीच्या शिफारसीचे पत्र घेऊन  राजभवन येथील सचिव आहेत प्रवीण दराडे यांच्याकडे दिलेलं आहे. आमच्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन, आम्ही इच्छा व्यक्त केली होती त्याचे मान राखून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी साडेपाच वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचं मान्य केलं आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिलेली आहे.

शपथविधीबाबत कोंडी निर्माण झाली होती का या प्रश्नावर बोलताना उदय सामंत म्हणाले, कसलीही कोंडी निर्माण झालेली नव्हती. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे देवेंद्र फडणवीस किंवा महायुतीतील सर्व नेते पदाधिकारी माजी मंत्री आमदार खासदार या सर्वांची प्रामाणिक इच्छा होती, या महाराष्ट्रासाठी आणि आम्हा सर्वांसाठी मोठे योगदान देऊन एक व्यासपीठ निर्माण केलं त्यांचं सरकारमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी असणं हेच सर्वांच्या दृष्टीने आवश्यक होतं. हे आमच्या आणि जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं होतं. म्हणून काल देखील शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना विनंती केली, त्यांनी संघटन प्रमुख आणि पक्षप्रमुख म्हणून महाराष्ट्रभर फिरून संघटन करून अन्य कोणाला तरी संधी द्यायची हे आम्हाला कोणालाही मान्य नाही, तुम्ही पक्षप्रमुख आहात आम्ही सर्वजण तुमच्या सोबत आहोत. परंतु, ते उपमुख्यमंत्री बनले पाहिजेत अशी सर्व शिवसैनिकांची इच्छा होती ती आज एकनाथ शिंदे यांनी पूर्ण केली आहे. त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत, असेही उदय सामंत यांनी पुढे म्हटलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Embed widget