एक्स्प्लोर

धुळे महापालिका | अनिल गोटे यांची पत्नी हेमा गोटे विजयी

हेमा गोटे यांच्यासमोर अनिल गोटे यांचे विरोधक असलेल्या मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे (भाजप) यांचं आव्हान होतं.

धुळे : अनिल गोटे यांच्या लोकसंग्राम पक्षाला अपेक्षित यश मिळालं नसलं, तरी त्यांच्या पत्नी हेमा गोटे विजयी झाल्या आहेत. लोकसंग्रामच्या उमेदवारांपैकी एकमेव हेमा गोटे यांनी विजय मिळवला. भाजपच्या उमेदवाराला त्यांनी चारी मुंड्या चित केलं. हेमा गोटे धुळे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 5 ब मधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. अनिल गोटे यांचे विरोधक असलेल्या मनोज मोरे यांच्या पत्नी भारती मोरे भाजपतर्फे त्यांच्याविरोधात मैदानात होत्या. अनिल गोटे यांनी पत्नी हेमा गोटे यांना लोकसंग्राम पक्षाकडून धुळ्याच्या महापौरपदाची उमेदवार घोषित केली होती. मात्र लोकसंग्राम जिल्ह्यात फारशी चमक दाखवू शकला नाही. अनिल गोटे यांचे पुत्र तेजस गोटे यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दरम्यान, धुळ्यातील भाजपच्या विजयानंतर मंत्री गिरीश महाजन आणि अनिल गोटे यांच्यामध्ये खडाजंगी झाली. भाजपने ईव्हीएममध्ये घोटाळे करुन विजय मिळवल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला आहे. भाजप गुंडांचा पक्ष असून बाहेरुन आणलेल्या गुंडांना पक्षात प्रवेश दिला जात असल्याचा घणाघातही त्यांनी केला. मतदानाच्या दिवशीच अनिल गोटे यांच्या गाडीवर दगडफेक झाली होती. विरोधकांनी आपल्या हत्येचा कट रचल्याचा आरोप यावेळी अनिल गोटेंनी केला. मात्र गोटेंना स्टंटबाजीची जुनी खोड असल्याचा प्रतिहल्ला भाजप खासदार सुभाष भामरेंनी केला. नाराज अनिल गोटेंनी गेल्या महिन्यात राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी चर्चा करुन त्यांना थोपवून धरलं. त्यानंतर पक्षाने फसवणूक केल्याचा दावा करत गोटे यांनी राजीनामा दिला आणि नव्या पक्षाची घोषणा केली.

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result LIVE: सतेज पाटील घामटा काढणार की महायुतीचा अंगारा, भंडारा अन् शपथा कामाला येणार? क्राॅस व्होटिंग सुद्धा खेळ बिघडवणार??
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!
महायुतीला धक्क्यावर धक्के, हसन मुश्रीफांचे सुपुत्र पराभूत, शौमिका महाडिकही हरल्या; गोकुळमध्ये सतेज पाटलांनी 'शिट्टी' वाजवली!

व्हिडीओ

Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद
Mann Suddha Tujha Season 3 : युरेका...युरेका | मन सुद्ध तुझं | Episode 3 | ABP Majha
Shetitil Navdurga | Seema Chavan | पिकं बदलत गेली… पण भरघोस उत्पन्नाचा तिचा ध्यास कधीच बदलला नाही!
Kolhapur-Gokul Election : लावा भंडारा, बुक्का आणि मारा शिक्का! | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
JIO IPO : जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, 8110 कोटींसाठी अडीच लाख कोटींची बोली, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
जिओच्या आयपीओसाठी अँकर इन्वेस्टर्सची 30 पट मागणी, विदेशी आणि भारतीय फंड हाऊसेसचा दमदार प्रतिसाद
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result Live: गोकुळच्या निवडणुकीत उलटफेर सुरुच, आता महायुतीचा उमेदवार फेरमतमोजणीत विजयी, एक जागा वाढली
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
Gokul Election Result LIVE: सतेज पाटलांनी एकहाती गोकुळ खेचलं; मुख्यमंत्र्यांची मुंबईतून फिल्डिंग, तीन कॅबिनेट मंत्री, दोन खासदार, अन् 10 आमदारांना एकाचवेळी धोबीपछाड देत महायुतीला धोबीपछाड
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑक्टोबर 2026 | सोमवार
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, तिन्ही आरोपी सज्ञान, बिश्नोई गँगच्या ऑडिओबद्दलही पोलीस उपायुक्तांनी दिली माहिती
BCCI : मुंबईकर रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
रमेश पोवार यांची निवड समितीत एंट्री, प्रज्ञान ओझाचं अध्यक्षपदी प्रमोशन, बीसीसीआयची मोठी घोषणा
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
कोल्हापूरचं राजकारण बंटी पाटलांना विचारुन करायचं;'गोकुळ' जिंकताच विश्वजीत कदमांचा आणखी एक डायलॉग
Gokul Election Result : गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
गोकुळमध्ये सतेज पाटलांचे 14 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर, महायुतीला मोठा झटका!
Embed widget