एक्स्प्लोर

Dhule Assembly Election : धुळे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कुणाची बाजी? 5 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

Dhule District Vidhan Sabha Election 2024 : धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. या पाचही मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे.

धुळे : एकेकाळी धुळे (Dhule) जिल्हा हा काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर भाजपने (BJP) हा जिल्हा काबीज केला. तर 2019 सालच्या निवडणुकीत एमआयएम (MIM) पक्षाने धुळ्यात आपले पाय रोवले. धुळ्यात एकूण पाच मतदारसंघात समावेश होतो. त्यात काँग्रेस, भाजप, अपक्ष आणि एमआयएम या सर्वच पक्षांचा वरचष्मा पाहायला मिळतो. धुळे जिल्ह्यात लोकसभेत मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने कौल दिला आहे.  

धुळे जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघ येतात. यात धुळे शहर, धुळे ग्रामीण, शिंदखेडा शिरपूर आणि साक्री यांचा समावेश होतो. पाचही विधानसभा मतदारसंघात शिंदखेडा, शिरपूर या ठिकाणी भाजपाची तर साक्री विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार 2019 च्या निवडणुकीत विजयी झाले होते तर धुळे ग्रामीणमधून काँग्रेसने आणि धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून एमआयएमने विजय प्राप्त केला होता. धुळे जिल्ह्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला दोन जागा काँग्रेसला एक एमआयएमला एक आणि अपक्ष एक असे विजयी झाले होते. यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

धुळे जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती 

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1

धुळे शहर

अनुप अग्रवाल (भाजप) अनिल गोटे (ठाकरे गट)

फारूक शहा (एमआयएम)
इर्शाद जहागीरदार (समाजवादी पार्टी) 

2 धुळे ग्रामीण राम भदाणे (भाजप) कुणाल पाटील (काँग्रेस)  हिलाल माळी, (अपक्ष)   
3 शिंदखेडा  जयकुमार रावल (भाजप) संदीप बेडसे (शरद पवार गट)  श्याम सनेर (अपक्ष)   
4 शिरपूर कांशीराम पावरा  (भाजप) बुधा पावरा (कम्युनिस्ट पक्ष)   जितेंद्र ठाकूर (अपक्ष)  
5 साक्री 

मंजुळा गावित, (शिवसेना शिंदे गट)

मोहन सूर्यवंशी (भाजप)

बापू चौरे, काँग्रेस    

धुळे शहर विधानसभा मतदारसंघ 

धुळे शहरात भाजपाचे अनुप अग्रवाल, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे माजी आ. अनिल गोटे आणि आणि एमआयएमचे आ. फारूक शाह तसेच समाजवादी पार्टीचे इर्शादभाई जहागिरदार रिंगणात असल्याने याठिकाणी भाजपा, शिवसेना उध्दव ठाकरे गट, एमआयएम आणि समाजवादी पार्टी अशी चौरंगी लढत पहायला मिळत आहे. 

धुळे ग्रामीण मतदारसंघ

धुळे ग्रामीण मतदार संघात काँग्रेसचे आ. कुणाल पाटील विरूध्द भाजपाचे राम भदाणे या दोन प्रमुख पक्षात लढत होईल असे वाटत होते. मात्र शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे हिलाल माळी यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने याठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाली आहे. परिणामी काँग्रेस, भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत याठिकाणी पहायला मिळत आहे. 

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघ

शिंदखेडा मतदार संघात भाजपाचे आ. जयकुमार रावल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे संदीप बेडसे यांच्यात लढत होण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने याठिकाणी महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचे दिसत आहे. परिणामी याठिकाणी भाजपा, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अपक्ष अशी तिरंगी लढत पहायला मिळत आहे.

शिरपूर विधानसभा मतदारसंघ

शिरपूरमध्ये भाजपाचे आ. काशिराम पावरा आणि भारतीय कम्युनिष्ट पार्टी ऑफ इंडीयाचे कॉ. बुधा पावरा यांच्यासह राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे डॉ. जितेंद्र ठाकूर रिंगणात आहेत. परिणामी याठिकाणी भाजपा, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया आणि अपक्ष अशी तिरंगी लढत याठिकाणी पहायला मिळत आहे. 

साक्री विधानसभा मतदारसंघ

साक्रीत शिवसेना शिंदे गटाच्या आ. मंजुळा गावित, काँग्रेसचे प्रविण चौरे यांच्यासह भाजपाचे बंडखोर उमेदवार मोहन सुर्यवंशी रिंगणात आहेत. याठिकाणी महायुतीत बंडखोरी झाल्याचे दिसत असून शिवसेना शिंदे गट, भाजपा आणि अपक्ष अशी तिरंगी लढत याठिकाणी पहावयास मिळत आहे. 

आणखी वाचा 

Nashik Assembly Election : नाशिक जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण भिडणार? 15 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
RBI : आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात 
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dr Tara Bhavalkar: 10वी पर्यंतच शिक्षण मराठीतच हवं,मराठी साहित्य संमेलनाध्यक्षा तारा भवाळकरांचं भाषणABP Majha Marathi News Headlines 9 AM TOP Headlines 9 AM 22 February 2025Nitesh Rane : ठाकरेंच्या शिवसेनेवर थेट 'प्रहार'राणे म्हणातात..कर्जाची परतफेड व्याजासहABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines 8 AM 22 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court : सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
सासरची क्रूरता सिद्ध करण्यासाठी हुंड्याच्या आरोपाची गरज नाही; सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाचा निर्णय फिरवला
RBI : आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
आरबीआयचा एका बँकेसह दोन फायनान्स कंपन्यांना दणका, सिटी बँकेला 39 लाखांचा दंड
SSC Exam Paper Leak : दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
दहावीच्या पेपर फुटी प्रकरणात मोठी कारवाई, पोलिसांनी ठोकल्या तीन जणांना बेड्या
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात 
वकिलांवर सरकारी पाळत ते संप-बहिष्कारावर बंदी! देशभरातील वकील प्रस्तावित अॅडव्होकेट कायद्यातील बदलांच्या विरोधात
Nashik News : नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
नाशिकमधील 'त्या' अनधिकृत धार्मिकस्थळावर कारवाई; जमावबंदी लागू, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात
उद्धव ठाकरेंनी विरोधी पक्षनेतेपदासाठी आदित्य ठाकरेंचं नाव पुढं केलं, भास्कर जाधवांपुढं नाराजीशिवाय पर्याय नाही : नितेश राणे
भास्कर जाधव यांना सतरंजी उचलणे, मोबाईल उचलणे अशी काम राहिलेत, नाराजीशिवाय पर्याय नाही: नितेश राणे
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
अमित शाह पुण्यात दाखल, 2 दिवसांचा दौरा; पुणेकरांसाठी वाहतुकीत बदल, जड वाहनांना 24 तास प्रवेश बंद
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
MPSC उत्तीर्ण 498 उमेदवारांना अखेर नियुक्ती, शासन आदेश जारी; मुख्यमंत्र्‍यांकडून अभिनंदन, तारीखही दिली
Embed widget