विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, 'या' नेत्यांची नावं चर्चेत
विधानसभा निवडणुकीच्या निकालनंतर भाजप-शिवसेनेचे सरकार पुन्हा येणार हे स्पष्ट झालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोधी पक्षनेता असणार हे देखील स्पष्ट झालं. मात्र विरोधी पक्षनेता कोण बनणार यावरून रस्सीखेच होण्याची शक्यता आहे.
![विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, 'या' नेत्यांची नावं चर्चेत dhananjay munde, jitendra awhad, jayant patils name in race for opposition leader mumbai विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची शक्यता, 'या' नेत्यांची नावं चर्चेत](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/09/29180917/vidhan-sabha.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर भाजप-शिवसेना सत्ता स्थापन करणार हे जवळपास निश्चित झालं आहे. भाजप, शिवसेनेनंतर सर्वाधिक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार हे देखील स्पष्ट आहे. मात्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीमध्ये रस्सीखेच होण्याची चिन्ह आहेत.
सर्वात मोठा विरोधी पक्ष असल्याने विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादीला मिळणार आहे. मात्र विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादीत अनेकजण स्पर्धेत आहेत. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचे नाव या स्पर्धेत आघाडीवर आहे.
विधान परिषदेच्या विरोधी पक्ष नेतेपदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांनी सांभाळली आहे. तो अनुभव पाहता त्यांचं नाव या स्पर्धेत सर्वात पुढे आहे. तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांची नावंही विरोधी पक्षनेतेपदाच्या शर्यतीत आहे.
- माझ्या घराचे दरवाजे सर्वांसाठी खुले असतील, पराभवानंतर पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट व्हायरल
- भाऊ जिंकला, बहिण हरली, परळीत धनंजय मुंडेंचाच गुलाल, 'बहिणाबाई' पंकजा मुंडेंना पराभवाचा धक्का
विधानसभा निवडणुकीत भाजप 105 जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष म्हणून या निवडणुकीत समोर आला आहे. मात्र 2014 च्या निवडणुकीशी तुलना केली तरी यंदा भाजपला 17 जागांचा फटका बसला आहे. दुसऱ्या स्थानी 56 जागांसह शिवसेना आहे. शिवसेनेलाही 7 जागांचा फटका बसला आहे. राष्ट्रवादीला 54 जागा तर काँग्रेसला 44 जागा मिळाल्या आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीला अनुक्रमे 2 आणि 13 जागांचा फायदा झाला आहे. मनसेनेही एक जिंकली आहे.
VIDEO | पक्षांतर लोकांना पटलं नाही, शरद पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)