Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांच्या माजी सचिवांची भाजपचे आमदारांवर जळजळीत टीका; खतगावकरांचा देवेंद्र फडणवीसांकडून समाचार
Devendra Fadnavis on Balaji Khatgaonkar : अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर यांनी भाजप आमदार डॉ. तुषार राठोड यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. त्यावर आता देवेंद्र फडणवीसांनी भर सभेत समाचार घेतलाय.
Devendra Fadnavis on Balaji Khatgaonkar मुखेड: नांदेड जिल्ह्यातील मुखेड मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बालाजी खतगावकर (Balaji Khatgaonkar) यांनी भाजप आमदार डॉ. तुषार राठोड (Tushar Rathod) यांच्या बद्दल अपशब्द वापरले होते. एका सभेत डॉ. तुषार राठोड यांच्यावर टीका करताना माणसाची औलाद आहे की कुत्र्याची, असे शब्द खतगावकरांनी वापरले. दरम्यान, आज जाहीर सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी खदगावकरांच्या त्या वाक्यावरून त्यांचा चांगलाच समाचार घेतला.
मी एक गोष्ट सांगतो. फक्त ती गोष्ट लाईटली घेऊ नका. मी कोणाला कुत्रा म्हणणार नाही. ते वाईट शब्द वापरत असतील माझ्या तुषारबद्दल, पण मी तसं करणार नाही. असं म्हणत फडणवीस यांनी जाहीर भाषनात बैलगाडी आणि कुत्र्याची गोष्टी सांगीतली. मी पुन्हा सांगतो कोणालाही कूत्रा म्हणत नाही,कोणीही कुत्रा देखील नाही. ते सन्माननीय व्यक्ती आहेत . परंतु मी तुम्हाला समजावं म्हणुन गोष्ट सांगीतली, असं फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री देखील तुषार राठोड यांच्याच पाठीशी
बालाजी खतगावकर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांचे माजी सचिव आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्र्यांचा पाठबळ असल्याची चर्चा आहे. यावर देखील फणवीस यांनी स्पष्टीकरण दिले. कोणी कोणाचं नाव घेत असेल तर त्या अफवेला बळी पडू नका. मी जबाबदारीने सांगतो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब डॉ. तुषार राठोड यांच्याच पाठीशी आहेत . असंही फडणवीस म्हणाले ..
तुषारला आमदार करून पाठवा , मी मंत्री करून पाठवतो - फडणवीस
नांदेड जिल्हयातील मुखेड मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर तुषार राठोड याला मंत्री करून पाठवतो असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस त्यांनी जाहीर सभेत सांगितले. आज मुखेड येथे देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. तुम्ही मला आमदार द्या , मी त्याला आमदार ठेवणार नाही, त्याला मंत्री करून पाठवतो, असेही फडणवीस म्हणाले. पण माझी एक अट आहे . तुषार नुसता निवडून आला तर मंत्रिपद नाही . तुम्हीं मोठं मताधिक्य दिलं तर मंत्री बनवून वापस पाठवीन, असही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
काय म्हणालेत बालाजी खतगावकर?
कोणत्याही गावात, कोणत्याही जिल्ह्यात तुम्हाला मतदार यादीमध्ये नाव टाकता येतं. कारण आपण भारतीय आहोत. पण, ज्यांनी या घटनेच्या कायद्यान्वे, तुमच्या मतांनी निवडून गेलेले, विधीमंडळाचे सदस्य राहिलेले, त्यांना वाटतं आहे, बालाजी खतगावकर बाहेरचा आहे, म्हणजे त्यांचे डोके ठिकाणावर आहेत का? की त्यांचा मेंदू गुडघ्यामध्ये आहे. ही घटना समजली नाही. म्हणजे किती दुर्दैव आहे. माणसाची औलाद आहे की कुत्र्याची औलाद आहे. कुत्रे गल्लीमध्ये एकमेकांना येऊ देत नाहीत. पण, आपण मनुष्य आहोत. घटनेने दिलेला अधिकार आहे.
आता मी इथला मुखेडचा रहिवासी आहे. माझं आणि माझ्या पत्नीच्या या मतदार यादीत नाव आहे. तुम्ही कधीही ऑनलाईन तपासून घेऊ शकता. ज्या-ज्या मुखेडच्या रहिवाश्याला अधिकार आहे, तो अधिकार मला आहे. आता मी बसमध्ये बसलेला आहे, मी बाहेरचा नाही. मुखेडच्या बसमध्ये बसलेला आहे, हे मी तुमच्या माध्यमातून त्यांना अवगत करतो, मी कधी कोणावर टीका करत नाही, बऱ्याच गोष्टी मी लोकांकडून ऐकतो, असंही बालाजी खतगावकर पुढे म्हणालेत.
हे ही वाचा