एक्स्प्लोर

अनिल देशमुख यांना क्लीनचीट नाही, मी अहवालात उल्लेख केलेला नाही; न्या. चांदीवाल यांचा खळबळजनक दावा

Chandiwal On Anil Deshmukh: अनिल देशमुखांचा क्लिनचीटचा दावा न्या. चांदीवाल यांनी एबीपी माझावर सपशेल फेटाळला आहे.

Chandiwal Commission: माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्यावर पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी 100 कोटींच्या वसुलीचे (Anil Deshmukh 100 crore bribery case) आरोप केले. या प्रकरणात चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती चांदीवाल (Chandiwal Commission) यांनी आपल्या अहवालात आपण देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाही असं म्हटलंय. एबीपी माझाचे ज्येष्ठ प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी न्या. चांदीवाल यांची EXCLUSIVE मुलाखत घेतली... या मुलाखतीत न्या. चांदीवाल यांनी स्फोटक आणि खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. योग्य पुरावे आयोगासमोर समोर येऊ दिले नाहीत असं न्या. चांदीवाल यांनी म्हटलं आहे. विशेष म्हणजे चांदीवाल आयोगाने आपल्याला क्लीनचीट दिल्यामुळेच अहवाल सार्वजनिक होऊ दिला जात नाही असा आरोप अनिल देशमुख वारंवार करतात. मात्र अनिल देशमुखांचा क्लीनचीटचा दावा न्या. चांदीवाल यांनी एबीपी माझावर सपशेल फेटाळला आहे.

गृहमंत्री असताना  मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी माझ्यावर 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर या प्रकारणाची चौकशी करण्यासाठी न्यायमूर्ती कैलास चांदीवाल यांच्या अध्यक्षतेखाली आयोग नेमण्यात आला. या संपूर्ण चौकशीनंतर आयोगाने दिलेल्या अहवालात मला क्लीन चिट देण्यात आली. मात्र राज्य सरकारने हा अहवाल मला क्लीनचिट मिळाल्यामुळे जाणीवपूर्वक दडवून ठेवला असल्याचा आरोप अनिल देशमुख वारंवार करताना दिसतात. मात्र न्या. चांदीवाल यांनी अनिल देशमुखांना क्लीनचीट दिलेली नाहीय, असा खळबळजनक दावा केला आहे.

न्यायमूर्ती चांदीवाल नेमकं काय म्हणाले?

अनिल देशमुख यांना क्लीनचीट दिलेली नाही. मी माझ्या अहवालात क्लीनचीट हा शब्दच वापरला नाहीय. परमबीर सिंह यांनी जी माघार घेतली, त्याबद्दल मी माझ्या अहवालात टीका केली आहे. पण मी क्लिनचीट दिलेली नाही. साक्षी पुरावा आला नाही. अहवालात पुरावा नाही असं म्हटलं आहे. परमबीर सिंह, सचिन वाझे यांनी त्यांच्याकडे पुरावे असूनही दिले नाही. पुरावे दिले असते तर नक्कीच काही घडलं असतं, असं चांदीवल यांनी म्हटलं आहे. 

न्यायमूर्ती चांदीवाल यांनी केलेले मोठे गौप्यस्फोट-

1. देशमुख आणि वाझेकडून फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, शपथपत्रात वाझेनं अजित पवार, शरद पवारांची नाव घेतली. पण नाव घेणाऱ्यांचे मनसुबे ओळखून नाव रेकॉर्डवर घेतली नाहीत 
2. चांदीवाल आयोगाच्या अहवालात क्लीनचिट असा शब्दप्रयोग नाही, उलट योग्य साक्षी पुरावे मिळाले नाहीत अशी टिपण्णी.
3. वाझे, परमबीर आणि देशमुख एकमेकांना भेटायचे आणि त्यानंतर वाझेनं साक्ष फिरवली अशा आशयाचा चांदिवाल यांची प्रतिक्रिया आहे
4. तेरी भी चूप मेरी भी चूप असं सगळं सुरू होतं , साक्षी पुराव्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही, सत्य बाहेर येऊ नये यासाठी प्रयत्न झाले
5. अहवालाच्या बाबी कोणत्याच सरकारच्या पचनी पडणार नाही.

अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली- न्यायमूर्ती चांदीवाल

सचिन वाझेने दोन राजकीय व्यक्तिमत्वांची नावं घेतली होती, अजित पवार आणि शरद पवार यांची नावं वाझेंनी घेतली. मात्र ती नावं मी रेकॉर्डवर घेणार नाही असं वाझेंना सांगितलं. फडणवीसांना गुंतवण्याचाही प्रयत्न वाझे आणि देशमुखांनी केला. मात्र ते रेकॉर्डवर घेतलं नाही. त्यातून प्रसिद्धी मिळते. मात्र ते मला होऊ द्यायचं नव्हतं. राजकीय व्यक्तींना गुंतवून स्वतःच्या प्रसिद्धीचा मिळवायचा प्रयत्न दिसत होता, मात्र मी ते होऊ दिलं नाही.  सचिन वाझेने शपथपत्रात अजित पवार, शरद पवारांचं नाव घेतलं. तसंच वाझे आणि अनिल देशमुखांनी फडणवीसांचं नावही गुंतवण्याचा प्रयत्न झाला असा गौप्यस्फोट न्या. चांदीवाल यांनी केलाय. मात्र हे प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं लक्षात येताच आम्ही हे रेकॉर्डवर घेतलं नाही असं चांदीवाल यांनी एबीपी माझाच्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत म्हटलंय.

अहवालात क्लीनचिट असा शब्दप्रयोग नाही, Video:

मागील काही वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थानला बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Gold Rate :  सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Stree Mukti Sanghatana Majha Katta : स्त्री मुक्ती संघटनेच्या रणरागिणी 'माझा कट्टा'वर
Naxal Gadchiroli : आत्मसमर्पण केलेल्या नक्षल दांपत्याच्या घरी नवा पाहुणा Special Report
Smriti Mandhana Marriage : स्मृती -पलाशच्या लग्नाची सांगलीत लगबग Special Report
Pune Police : पुणे पोलिसांचा इंगा, मध्यप्रदेशात डंका Special Report
Delhi Blast : जिहादी डॉक्टरांच्या टोळीचं भयंकर कारस्थान Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
शुभमन गिल दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेला मुकणार? रोहित शर्मा नव्हे कॅप्टनपदासाठी 'या' खेळाडूचं नाव आघाडीवर
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Maharashtra Live blog: महेंद्र दळवींच्या बालबुद्धीची मला कीव येते, अनिकेत तटकरेंचा आमदार दळवींवर हल्लाबोल
Sanju Samson : आयपीएलमध्ये राजस्थानला बाय बाय केलं, आता संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
आयपीएलमध्ये राजस्थानची साथ सोडणाऱ्या संजू सॅमसनवर नवी जबाबदारी, 'या' संघाचं नेतृत्व करणार
Gold Rate :  सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
सोनं एका महिन्यात 8000 रुपयांनी स्वस्त, खरेदीसाठी योग्य वेळ कोणती? तज्ज्ञ म्हणतात...
Loan : चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
चांगलं कर्ज आणि वाईट कर्ज म्हणजे काय? वाईट कर्जाच्या जाळ्यातून कसं बाहेर पडायचं? जाणून घ्या
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 नोव्हेंबर 2025 | शनिवार
India vs South Africa, 2nd Test: क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच गुवाहाटीत तब्बल 148 वर्षांची परंपरा मोडली गेली!
Salary : पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
पगार लवकर संपतो, तज्ज्ञांनी सुचवला 50-30-20 फॉर्म्युला, जाणून घ्या खर्चावर कसं नियंत्रण ठेवायचं?
Embed widget