एक्स्प्लोर

delhi vidhan sabha election Final Result : भाजपची 48 जागांवर मुसंडी, आप पक्षाला फक्त 22 जागा, काँग्रेसला अवघी 6 टक्के मतं; जाणून घ्या A टू Z निकाल!

Delhi Election 2025 Result : दिल्लीमध्ये आम आदमी पार्टीची सत्ता भाजपने उलथवून लावली आहे. आता येथे सत्ताबदल झाला असून भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे.

Delhi Election 2025 Result : दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. या निवडणुकीत दिल्लीकरांनी भाजपच्या पारड्यात मतांचं भरभरून दान टाकलं आहे. विशेष म्हणजे गेल्या वेळी स्पष्ट बहुमत मिळालेल्या आप पक्षाला यावेळी दिल्लीकरांनी ठेंगा दाखवला आहे. भाजप आता या ठिकाणी एकहाती सत्ता स्थापन करणार आहे. 

दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल काय? 

दिल्लीच्या विधानसभा निडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. या निवडणुकीत भाजपाने अभूतपूर्व यश मिळवलं आहे. एकूण 70 जागांपैकी भाजपाला एकूण 48 जागा मिळाल्या आहेत. तर आम आदमी पार्टीला फक्त 22 जागांवर विजय मिळाला आहे. विशेष म्हणजे कधीकाळी सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला या निवडणुकीत एकही जागा जिंकता आली नाही. 

कोणत्या पक्षाला किती मतं? 

यावेळच्या विधानसभा निवडणुकीत दिल्लीच्या जनतेने भाजपवर विश्वास ठेवला आहे. भाजपला येथे एकूण 45.56 टक्के मते मिळाली आहेत. तर आम आदमी पार्टीला येथे 43.57 टक्के मते मिळाली आहेत. काँग्रेसला एकूण 6.34 टक्के मते मिळाली आहेत. जयदू पक्षाला एकूण 1.06 टक्के मते मिळाली आहेत. बसपाला 0.58 टक्के, सीपीआयला 0.02 टक्के, एलजेपीएआरव्ही पक्षाला 0.53 टक्के, एनसीपीला 0.06 टक्के, मते मिळाीली आहेत. नोटाला येथे 0.57 टक्के मते मिळाली आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी मान्य केला पराभव

दिल्लीच्या जनेतेने दिलेला हा कौल माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान्य केला आहे. आम्ही पुढच्या काळात एक समक्ष विरोधी पक्ष म्हणून काम करू, असं त्यांनी म्हटलंय. तसेच आप पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत कठीण काळात पक्षाचा प्रचार केला, त्यामुळे मी त्यांचे अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या निकालानंतर दिल्लीकरांचे आभार मानले. तसेच आगामी काळात आम्ही दिल्लीच्या विकासासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.

मंत्रालयातून एकही कागद बाहेर जाता कामा नये

दरम्यान, या निकालानंतर आता दिल्लीच्या राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. सत्ताबदलानंतर नायब राज्यपालांनी एक आदेश काढला आहे. या आदेशाअंतर्गत मंत्रालयातून एकही कागद बाहेर जाता कामा नये, असे निर्देश दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

Delhi Election Result 2025: दिल्लीत 'आप'चा गड ढासळला, तर काँग्रेसचा सुपडासाफ; भाजपची मोठी खेळी, अवघे 100 तास ठरले निर्णायक

Delhi Vidhansabha Election Result : दिल्लीचे निकाल येताच नायब राज्यपालांचे आदेश, मंत्रालयातून एकही कागद बाहेर जाता कामा नये

Devendra Fadnavis : केजरीवालांच्या खोट्या राजकारणाचा बुरखा फाडला, दिल्लीतील विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणारABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 March 2025Superfast News Nagpur : नागपूरमध्ये दोन गटात राडा, आज तणावपूर्ण शांतता, पाहुया सुपरफास्ट न्यूजABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
राज ठाकरेंच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी; 23 मार्चला पक्षाची नवी रचना, औरंगजेब अन् छावावरही पदाधिकाऱ्यांना सूचना
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
स्वार्थासाठी कुठल्याही थराला जाणारी ही राजकारणातील कीड, आदित्य ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल, म्हणाले राज्यात द्वेष पसरवणारे हेच 
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Embed widget