एक्स्प्लोर
Advertisement
अफझलखानाच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण, काँग्रेसची टीका
शिवसेनेचे नेते जरी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले असले तरी बहुतांश शिवसैनिकांना मात्र हे मान्य नाही, यावेळी शिवसैनिक देखील भाजप-शिवसेनेच्या विरोधात मतदान करेल असेही सावंत यावेळी म्हणाले.
रत्नागिरी : अमित शाहांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरेंनी जाणं म्हणजे अफझलखानाच्या भेटीला शिवसेनेच्या उंदरांची फलटण जाणं आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. आज बाळासाहेब असते तर उद्धव ठाकरेंचं कान पकडून त्यांनी त्यांना खडसावले असते आणि उठाबशा करायला लावल्या असत्या, असा टोलाही सावंत यांनी लगावला आहे.
VIDEO | उद्धव ठाकरेंसह अनेक नेते गुजरातमध्ये दाखल, सेल्फीसाठी चाहत्यांची गर्दी | अहमदाबाद | एबीपी माझा
शिवसेनेचे नेते जरी भाजपच्या मांडीवर जाऊन बसले असले तरी बहुतांश शिवसैनिकांना मात्र हे मान्य नाही, यावेळी शिवसैनिक देखील भाजप-शिवसेनेच्या विरोधात मतदान करेल असेही सावंत यावेळी म्हणाले. ही महायुती नसून देशासमोर महाआपत्ती आहे, ही आपत्ती निवारण करण्यासाठी देश सज्ज झाला आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये काँग्रेस विरोधात लढणाऱ्या दोन्ही पक्षांकडे स्वाभिमान नाहीये, असेही ते म्हणाले. सचिन सावंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. त्यावेळी त्यांनी विनायक राउत आणि निलेश राणे हे दोन्हीही उमेदवार मोदींच्या कडेवर बसलेले आहेत, अशी टीका केली.
अमित शाहांचा गांधीनगरमधून उमेदवारी अर्ज दाखल, उद्धव ठाकरेंची हजेरी
जोरदार शक्तीप्रर्शन करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज (30 मार्च) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. गुजरातच्या गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून अमित शाह यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अमित शाहांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एनडीएतील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिरोमणी अकाली दलाचे प्रकाशसिंह बादल, लोक जनशक्ती पार्टीचे रामविलास पासवान केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह, अरुण जेटली यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement