(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mizoram Assembly Election : 750 रुपयांत गॅस, एक लाख रोजगार, पेन्शन आणि 15 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स; मिझोरामसाठी काँग्रेसचा जाहीरनामा
Congress Mizoram Manifesto : मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. काँग्रेसने मिझोराममधील जनतेला गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून ते आरोग्य विम्यापर्यंत अनेक आश्वासनं दिली आहेत.
Mizoram Assembly Election 2023 : मिझोराम (Mizoram) मधील आगामी विधानसभा निवडणूक (Mizoram Assembly Election) च्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने जाहीरनामा (Congress Mizoram Manifesto) प्रसिद्ध केला आहे. काँग्रेस (Congress) ने मिझोराममधील जनतेला गॅस सिलेंडरच्या किंमतीपासून ते आरोग्य विम्यापर्यंत अनेक आश्वासनं दिली आहेत. यामध्ये 750 रुपयांत गॅस, पेन्शन आणि 15 लाखांचा हेल्थ इन्शुरन्स याचा समावेश आहे. मिझोरममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहे. मिझोराममध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आपल्या जाहीरनाम्याद्वारे सर्वसामान्यांना आकर्षित करण्याचा जोरदार प्रयत्न करताना दिसत आहे. पेन्शन, स्वस्त दरात गॅस सिलिंडर आणि आरोग्य विमा अशी अनेक आश्वासनं काँग्रेसने दिली आहेत.
शेतकरी आणि उद्योजकांसाठी स्टार्टअप फंडिंग
राज्यात कनेक्टिव्हिटी, विमानतळ, वीज आदी चांगल्या पायाभूत सुविधांच्या विकासावरही काँग्रेस सरकार काम करेल, असं काँग्रेसच्या जाहीरनाम्यात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय काँग्रेस सरकार शेतकरी आणि उद्योजकांसाठी स्टार्टअप फंडिंगसाठीही तरतूद करणार असल्याचं आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलं आहे. सरकार स्थापन झाल्यास, काँग्रेस तरुण मिझो उद्योजक कार्यक्रम (YmElevate) राबवेल आणि मिझोराममधील तरुणांसाठी एक लाख रोजगार निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवेल.
दरमहा 2000 रुपये पेन्शनची घोषणा
काँग्रेसच्या जाहीरनाम्यात सरकारी कर्मचारी नसलेल्या कुटुंबांसाठी 15 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा संरक्षणास समर्थन देण्याचंही आश्वासन देण्यात आलं आहे. असाध्य रुग्णांसाठीही काँग्रेस पाच कोटी रुपयांचे बजेट ठेवणार आहे. तसेच, वृद्धापकाळ निवृत्ती वेतन दरमहा 2000 रुपयांपर्यंत वाढवलं जाईल, असंही जाहीरनाम्यात म्हटलं आहे.
750 रुपयांत गॅस सिलेंडर
जाहीरनाम्यात आश्नासन देण्यात आलं आहे की, काँग्रेस एएवाय आणि पीएचएच कार्डधारक आणि महिला प्रमुख कुटुंबांना प्रति अनुदानित एलपीजी सिलेंडर 750 रुपये देईल. काँग्रेसने राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत विधवा आणि अपंगांना दिली जाणारी मदत दरमहा 2,000 रुपयांपर्यंत वाढवण्याचं आश्वासन दिलं आहे.
मिझोराममध्ये 7 नोव्हेंबरला निवडणूक
40 सदस्यीय मिझोरम विधानसभेसाठी 7 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीत मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसचा पराभव केला होता. मिझोरामसह मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. पाचही राज्यांतील मतमोजणी 3 डिसेंबरला होणार आहे.
कोणत्या राज्यात कधी मतदान? (Five State Voting & Counting Dates)
- मिझोराम - 7 नोव्हेंबर रोजी मतदान (Mizoram Election Voting Date)
- छत्तीसगड - 7 आणि 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Chhattisgarh Election Voting Date)
- मध्य प्रदेश - 17 नोव्हेंबर रोजी मतदान (Madhya Pradesh Election Voting Date)
- राजस्थान - 23 नोव्हेंबर रोजी मतदान (Rajasthan Election Voting Date)
- तेलंगणा - 30 नोव्हेंबर रोजी मतदान (Telangana Election Voting Date)
पाच राज्यांचा निकाल - 3 डिसेंबर रोजी (Assembly Election Counting Date)