मुस्लिमांची 99% मत काँग्रेसला, मात्र पक्ष मुस्लिमांना त्यांचे हक्क देत नाही; काँग्रेसचे नेते अनिस अहमद स्पष्टच बोलले, म्हणाले....
Election 2024 : मुस्लिम समुदाय 99% काँग्रेसला मत देतो, मात्र काँग्रेस मुस्लिमांना त्यांचे हक्क देत नाही. असे मत व्यक्त करत काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Anis Ahmad on Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुस्लिम समुदाय 99% काँग्रेसला (Congress) मत देतो, मात्र काँग्रेस मुस्लिमांना त्यांचे हक्क देत नाही. लोकसभेत महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवाराला संधी दिल्या गेली नाही. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही काँग्रेसने मुस्लिमांना इग्नोर केलंय. त्यामुळे मुस्लिम समाज नाराज असून आता त्यांना त्यांचा हक्क हवाय. मुस्लिम मतदारांची ही बाब पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाला आम्ही सर्व आजी-माजी मुस्लिम नेत्यांनी सांगितली आहे. अशी मत व्यक्त करत काँग्रेस नेते अनिस अहमद (Anis Ahmad) यांनी एबीपी माझाकडे एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया देत आपली भावना व्यक्त केली आहे.
99% मुस्लिम मत काँग्रेसला. मात्र त्यांना त्यांचे हक्क मिळत नाही- अनिस अहमद
काँग्रेसने लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून मुस्लिमांना एकही तिकीट दिली नाही. त्यानंतर विधान परिषदेमध्ये ही एकही जागा दिली नाही. असे असले तरी 99% मुस्लिम काँग्रेसला मत देतात. मात्र काँग्रेस मुस्लिमांना त्यांचा हक्क देत नाही. काँग्रेसच्या मुस्लिम नेत्यांनी ही बाब पक्षाचे महासचिव मुकुल वासनिक आणि प्रदेश प्रभारीरमेश चेन्निथला यांना सांगितली आहे. तर काँग्रेस श्रेष्ठीनी जास्तीत जास्त उमेदवारी मुस्लिमांना देऊ असे सांगितले आहे. मात्र आमचे म्हणणे एवढेच आहे, फक्त पराभूत होणारी जागा मुस्लिमांना देऊ नका. तर जिंकून येणारी जागा मुस्लिमांना द्यावी, अशी मागणी ही काँग्रेस नेते अनिस अहमद यांनी केली आहे.
पूर्ण भारतात 99% मुस्लिमांनी काँग्रेसला पाठिंबा, मात्र....
लोकसभेच्या वेळेला मुंबईमध्येही मुस्लिमांना उमेदवारी दिली नाही. अकोल्यात ही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. लोकसभेत महाराष्ट्रात एकही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली नाही. तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये ही काँग्रेसने मुस्लिमांना इग्नोर केलंय. त्यामुळे मुस्लिम समाज हा नाराज आहे. आता त्यांना त्यांचा हक्क हवाय. काँग्रेस श्रेष्ठीनी जास्तीत जास्त उमेदवारी मुस्लिमांना देऊ असे सांगितले आहे. मात्र, आमचे म्हणणे एवढेच आहे की, फक्त पराभूत होणारी जागा मुस्लिमांना देऊ नका. जिंकून येणारी जागा मुस्लिमांना द्यावी.
या निवडणुकीत ही मुस्लिम मतदार काँग्रेसला समर्थन करणार. पूर्ण भारतात 99% मुस्लिमांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत विदर्भातून जागा रिक्त (वजाहत मिर्झा यांची जागा ) झाल्यानंतर ही काँग्रेसने ती जागा मुस्लिमांना दिली नाही. त्यामुळे मुस्लिम समाजात त्यासंदर्भात मोठा रिएक्शन झाला आहे. असेही अनिस अहमद म्हणाले.
हे ही वाचा