एक्स्प्लोर

लोकसभेच्या नादात आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली, अमित देशमुखांचा राम सातपुतेंना टोला

लोकसभा उमेदवारीच्या नादात आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली. आता बीडचे पार्सल पुन्हा बीडला पाठवा, अशा शब्दात काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी भाजप उमेदवार राम सातपुतेंवर टीका केली.

Praniti Shinde : लोकसभा उमेदवारीच्या नादात आमदारकीही गेली आणि खासदारकीही गेली. आता बीडचे पार्सल पुन्हा बीडला पाठवा, अशा शब्दात काँग्रेस नेते अमित देशमुख (Amit Deshmukh) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांनी राम सातपुते (Ram Satpute) यांच्यावर टीका केली. आमदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या प्रचारार्थ कासेगाव येथे सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी भाजप उमेदवार सातपुते यांच्यावर सडकून टीका करण्यात आली.  

भगीरथ भालके यांचा काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंना पाठिंबा

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रचारही आता वेग धरु लागला आहे. आज कासेगाव येथे काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारसभेत अमित देशमुख आणि सतेज पाटील या दोन नेत्यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर सडकून टीका केली. बीआरएसमध्ये गेलेले नेते भगीरथ भालके यांनी काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे याना पाठिंबा दिल्यानंतर पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस नेते प्रकाश पाटील यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली 

आपल्या खुमासदार भाषणात आमदार अमित देशमुख यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर सडकून टीका केली. ते विधिमंडळात होते पण खासदारकीला उभारले आणि आता खासदारकीही गेली आणि आमदारकीही गेली असा टोला अमित देशमुखांनी लगावला. आता बीडचे हे पार्सल बीडला परत पाठवायची वेळ आल्याचे ते म्हणाले.  

राम सातपुतेंना जबरदस्तीनं उभं केलं

हाच धागा पकडत आमदार सतेज पाटील यांनी भाजप उमेदवार राम सातपुते यांच्यावर शेरेबाजी करताना हा जबरदस्तीने उभा केलेला उमेदवार आहे असा टोला लगावला. जो उमेदवार स्वतःच्या उमेदवारी अर्जावर सही करायचा विसरतो तो तुमचे भले काय करणार असा टोलाही सतेज पाटलांनी लगावला. ज्याला आपला उमेदवारी अर्ज भरता येत नाही, जो आपल्या अर्जावर सही विसरतो तो तुमच्या भविष्यकाळातील विकासावर काय सही करणार असा सवाल सतेज पाटलांनी केला. ज्याला उमेदवारी अर्ज भरता येत नाही तो आता लाखांच्या बाता करण्याचा प्रयत्न करत असल्याचे पाटील म्हणाले. आम्ही कोल्हापुरात जसे म्हणतो आमचे ठरलंय तसे सोलापूरकरांनी म्हणा की हे पार्सल बीडला पाठवायचे आहे असा टोलाही सतेज पाटलांनी लगावला. 

महत्वाच्या बातम्या:

राम सातपुतेंच्या पत्नीलाही उमेदवारी?; जानकरांनी उलगडला भाजपचा प्लॅन, अजित पवारांनाही लक्ष्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nandurbar Daru Bandi Voting : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजयABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 08 December 2024ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 December 2024Aaditya Thackeray On Rais Shaikh : समाजवादी पक्ष भाजपची बी टीम, आदित्य ठाकरेंचा आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ind vs Aus 3rd Test : अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
अश्विनच्या अन् हर्षित राणाचा पत्ता कट? तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग-11 होणार मोठा बदल, रोहित कोणाला देणार संधी?
Farmers Protest: दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
दिल्लीच्या सीमेवर पुन्हा एकदा राडा, आंदोलक शेतकऱ्यांना शंभू सीमेवरच अडवलं, अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या
Pakistan Economic Crisis : कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
कंगाल पाकिस्तानची अराजकतेकडे वाटचाल? व्यापाऱ्यांवर कराची दहशत, दूध आणि ब्रेडही महागणार
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
लाडक्या बहि‍णींना आता आर्थिक मदतीसह मिळणार सुरक्षा; मोबाईल अ‍ॅपद्वारे संकटकाळात होणार मदत, जाणून घ्या फीचर अन् वापर
आता मनसेला महायुतीत घेऊन फायदा नाही, राज ठाकरेंची सगळी हवा निघून गेलेय; रामदास आठवलेंचं रोखठोक वक्तव्य
फडणवीसांकडून मनसेला सोबत घेण्याचा विचार अन् रामदास आठवलेंचा डेडली स्ट्राईक, म्हणाले, 'राज ठाकरेंची हवा निघून गेलीय'
Jalgaon Crime : अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
अनैतिक संबंधात अडसर ठरलेल्या पतीचा प्रेयसीने काढला काटा; प्रियकराच्या मदतीने संपवलं
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
घरचे झाले थोडे… त्यात व्याह्याने धाडले घोडे! महायुतीच्या खातेवाटपाच्या तिढ्यात रामदास आठवलेंच्या फडणवीसांकडे 3 मोठ्या मागण्या
Saffron Farming Success: रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
रखरखत्या भूमीवर केशराचा प्रयोग, राहत्या घरीच कंद लावले, छत्रपती संभाजीनगरच्या निवृत्त अधिकाऱ्याची किमया
Embed widget