Nandurbar Daru Bandi Voting : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय
Nandurbar Daru Bandi Voting : नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय
जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद गावात दारुची बाटली अखेर आडवी झाली असून दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय झाला. नंदुरबारच्या असलोदमध्ये दारुबंदीसाठी मतदान घेण्यात आलं होतं. बॅलेट पेपरवर झालेल्या मतदानात 677 पैकी 612 महिलांनी दारुबंदीसाठी कौल दिला. त्यामुळे या गावात आता दारुबंदी होणार हे स्पष्ट झालंय. नंदुरबारमधील असलोद गावामध्ये दारुबंदीसाठी महिलांचे मतदान घेण्यात आलं. एकूण 1216 पैकी 677 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यापैकी 612 महिलांनी आडवी बाटली म्हणजे दारुबंदीच्या बाजूने मतदान केलं. तर 49 महिलांनी उभी बाटली म्हणजे दारुबंदीच्या विरोधात मतदान केलं. त्यानंतर मतमोजणीमध्ये दारुबंदीसाठी लढणाऱ्या महिलांचा मोठा विजय झाल्याचं स्पष्ट झालं. दारुबंदीच्या बाजूनं महिलांनी कौल दिल्यानं गावकऱ्यानी एकच जल्लोष केला.