UP Election: काँग्रेसकडून 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर, उन्नाव बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या आईलाही उमेदवारी
UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
Congress Announces First List of Candidate UP Assembly Election 2022: देशभरातील पाच राज्यांमध्ये निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. याचपार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी (Uttar Pradesh Assembly Election 2022) काँग्रेस पक्षाकडून आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या निवडणुकीत 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आल्याची माहिती, उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी दिलीय.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. याच दरम्यान, प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केलीय. "उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही 125 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करत आहोत. या यादीत एकूण 40 टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही राज्याच्या राजकारणाला नवी दिशा देण्याचा आमचा प्रयत्न आहे", असं प्रियंका गांधी यांनी म्हंटलय. सर्वात महत्वाचं म्हणजे संबंधित यादीत उन्नाव बलात्कार पीडित तरुणीच्या आईलाही उमेदवारी देण्यात आलीय.
पुढे प्रियंका गांधी म्हणाल्या की, "या यादीत काही महिला पत्रकार आहेत. एक अभिनेत्री आणि इतर संघर्षशील महिला आहेत, ज्यांनी काँग्रेसमध्ये असताना अनेक वर्षे संघर्ष केलाय. आज यूपीमध्ये हुकूमशाहीचं सरकार आहे. महत्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत ते समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. दरम्यान, काँग्रेस सोडून इतर पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांच्या प्रश्नावर प्रियंका गांधी म्हणाल्या की, "प्रत्येक निवडणुकीत असे घडते. काही लोक येतात, काही लोक जातात. काही घाबरतात. आपल्या संघर्षाला धैर्याची गरज आहे. परंतु, कोणाच्या जाण्यानं पक्षाला त्रास होतोच".
मतदान आणि मतमोजणी कधी?
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक सात टप्प्यात पार पडणार आहे. येत्या 10 फेब्रुवारीपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. 10 फेब्रुवारी (पहिला टप्पा), 14 फेब्रुवारी (दुसरा टप्पा), 20 फेब्रुवारी (तिसरा टप्पा), 23 फेब्रुवारी (चौथा टप्पा), 27 फेब्रुवारी (पाचवा टप्पा), 3 मार्च (सहावा टप्पा) आणि 7 मार्चला सातवा टप्पासाठी निवडणूक होणार आहे. तर, 10 मार्चला मतमोजणी होणार आहे.
हे देखील वाचा-
- Goa Election 2022 : गोव्यात काँग्रेसची शिवसेनेला 3 जागांची ऑफर तर राष्ट्रवादीला जागा सोडण्यात काँग्रेस अनुत्सुक
- Uttar Pradesh : निवडणुकीआधीच भाजपला झटका; कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा, समाजवादी पक्षात करणार प्रवेश
- UP Election 2022 : बसपा अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नाहीत
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha