एक्स्प्लोर

Uttar Pradesh : निवडणुकीआधीच भाजपला झटका; कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांचा राजीनामा, समाजवादी पक्षात करणार प्रवेश

UP Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिला आहे. 

UP Assembly Election 2022: उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा झटका बसला आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजप पक्षाचाही राजीनामा दिला असून ते आता समाजवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबत तीन आमदारांनीही राजीनामा दिला आहे. 

ट्विटरवरुन दिला राजीनामा
स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा ट्विटरवरुन दिला आहे. दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि व्यापाऱ्यांची घोर उपेक्षा झाल्यामुळे मी योगी मंत्रिमंडळातून राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 

कोण आहेत स्वामी प्रसाद मौर्य?

स्वामी प्रसाद मौर्य हे पाच टर्म आमदार असून त्यांची राजकीय कारकीर्द तब्बल 40 वर्षांची आहे. सन 2016 पर्यंत ते मायवतींसोबत बसपाचा चेहरा म्हणून होते. 2017 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि पुन्हा विधानसभेत निवडून गेले. स्वामी प्रसाद मौर्य हे उत्तर प्रदेशमधील मागास समाजाचा मोठा चेहरा समजले जातात. त्यामुळे त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळालं. आता विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर स्वामी प्रसाद मौर्यांनी भाजपला रामराम केला असून सपाच्या सायकलीवर सवार झाले आहेत. 

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याबरोबर समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांनी एक ट्वीट केलं असून त्यात त्यांनी स्वामी प्रसाद मौर्य यांच्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. 

स्वामी प्रसाद मोर्य यांनी मंत्रिपद सोडलं, पक्षही सोडला. पण त्यांची मुलगी संघमित्रा मौर्य या भाजपच्या खासदार आहेत. त्या मात्र भाजपमध्येत राहणार आहेत. पण, स्वामी प्रसाद मौर्य यांच्यानंतर मंत्री धर्म सिंह सैनी आणि दारा सिंह चौहान यांच्याही राजीनाम्याची चर्चा सुरु झाली आहे. हे तिघेही बसपाचे प्रमुख नेते होते. नंतर भाजपमध्ये थेट मुख्यमंत्री योगींच्या गटातले नेते बनले. आता त्यांच्यातल्या एका मंत्र्यानं पक्ष सोडला.

उत्तर प्रदेशमध्ये जातीय समीकरणाला महत्व
उत्तर प्रदेशच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राइतकंच जातीय समीकरणांचं महत्व आहे. तिथं ओबीसी समाजाचं अनेक मतदारसंघांमध्ये वर्चस्व आहे. तर काही मतदारसंघांमध्ये याच मतदारांची संख्या मोठी आहे. त्यामुळे स्वामी प्रसाद मौर्य यांचं जाण्यानं भाजपला फटका बसणार की मोदी-योगींच्या झंझावातासमोर त्याचा काहीही परिणाम होणार नाही हे 10 मार्चलाच कळेल. 

संबंधित बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget