एक्स्प्लोर

Congress-AAP Alliance: आम आदमी पार्टी आणि काँग्रेसच्या आघाडीची घोषणा; दिल्ली, हरियाणा, गुजरात, गोवा चार राज्यातलं जागावाटप जाहीर

Lok Sabha Elections 2024: चार राज्यातलं जागावाटप जाहीर करण्यात आलं. त्यानुसार दिल्लीत चार जागांवर आप तर काँग्रेस तीन जागांवर लढणार आहे.

नवी दिल्ली :  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections 2024)  आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची हातमिळवणी (Congress AAP Alliance)   केलीय. आप आणि काँग्रेसने एकत्र पत्रकार परिषद घेत आघाडीची घोषणा केली. चार राज्यातलं जागावाटप जाहीर करण्यात आलं. त्यानुसार दिल्लीत चार जागांवर आप तर काँग्रेस तीन जागांवर लढणार आहे. काँग्रेस आणि  आप आघाडीची घोषणा करताना आपचे संदीप पाठक म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक आम्ही एकत्र लढणार आहे. आम्हाला विश्वास आहे जनता आमच्यासोबत असून आम्ही निवडणूत जिंकणार आहे.  

हरियाणात काँग्रेस कुरूक्षेत्रची जागा लढणार आहे. हरियाणात काँग्रेस 9 तर आप 1 जागा लढवेल तर गुजरातमध्ये भरूच आणि भावनगरची जागा आप लढणार आहे. गुजरातमध्ये काँग्रेस 24 तर आप  दोन जागांवर लढणार आहे. तर गोव्यात दोन्ही जागा काँग्रेस लढेल. पंजाबमध्ये आपची सत्ता आहे. मात्र तिथे आघाडी करण्यात आलेली नाही. पंजाबमध्ये दोन्ही पक्ष वेगवेगळे लढणार आहे.

  हरियाणा दिल्ली  गुजरात  गोवा 
एकूण लोकसभा 10 07 26 02
काँग्रेस  09 04 24 02
आप 01 (कुरुक्षेत्र लोकसभा) 03 02 ((भावनगर +भरूच) 00

दिल्लीत कोणत्या जागा आप लढणार?

  • नवी दिल्ली
  • पूर्व दिल्ली
  • पश्चिम दिल्ली
  • दक्षिण दिल्ली
     
    या चार जागांवर आप लढणार आहे. 

दिल्लीत काँग्रेस कोणत्या जागावर लढणार?

  • चांदणी चौक
  • नॉर्थ ईस्ट 
  • नॉर्थ वेस्ट 

या तीन जागांवर काँग्रेस लढणार आहे. 

दिल्लीत भाजपचे सात खासदार

2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने दिल्लीतील सातही जागा जिंकल्या होत्या. चांदणी चौक मतदार संघातून हर्षवर्धन, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, पूर्व दिल्लीतून गौतम गंभीर, नवी दिल्लीतून मीनाक्षी लेखी, उत्तर पश्चिम दिल्लीतून हंसराज हंस, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा आणि दक्षिण दिल्लीतून रमेश बिधुरी हे खासदार विजयी झाले होते. 

आप आणि काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर यश नाही

लागोपाठ दोन लोकसभा निवडणुकीत आप आणि काँग्रेसला दिल्लीत एकाही जागेवर यश मिळाले नाही. त्यामुळे सध्या आप आणि काँग्रेसच्या युतीमुळे दिल्लीतील निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. तर भाजपने हे गठबंधन नाही तर ठगबंधन असल्याची टीका केली आहे.   

हे ही वाचा :

राहुल नार्वेकर लोकसभेच्या मैदानात, आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात प्रचाराचा नारळ फोडणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 50 न्यूज : 28 April 2024 : ABP MajhaUjjwal Nikam : शत्रू राष्ट्रातदेखील भारताकडे वाकड्या नजरेनं बघण्याची हिम्मत नाही - उज्ज्वल निकमMNS vs Thackeray Group Ratnagiri : रत्नागिरीत मनसे आणि ठाकरे गटाला सभेच्या वेळेवरून 'ठसन'Bhandup : भांडुपमध्ये पैशाने भरलेली व्हॅन जप्त; साडेतीन कोटींची रोकड मिळाली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vishwajeet Kadam : आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
आमदार विश्वजित कदमांनी चंद्रहार पाटलांना घेऊन सुरू केला प्रचार; तिरंगी लढतीवर काय म्हणाले?
Thane Loksabha 2024: प्रताप सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित, लवकरच घोषणा
सरनाईक, मीनाक्षी शिंदे नव्हे, ठाण्यातून एकनाथ शिंदेंचा हुकमी एक्का मैदानात; नाव जवळपास निश्चित
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
'आदित्यला वाचवण्यासाठी मोदींना मागच्या दाराने भेटायचे, आता त्यांनाच शिव्या देताय', रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल
Chhagan Bhujbal: मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
मनोज जरांगे हा पंतप्रधान मोदींपेक्षा मोठा नेता आहे का? छगन भुजबळांनी फटकारलं
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील सोढी बेपत्ता; मालिकेची टीम म्हणते...
Vijay Shivtare : आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
आता अजितदादांचा ऐका, आणखी किती दिवस शरद पवारांच्या नावाने मतं मागणार? विजय शिवतारेंनी रोहित पवार, सुप्रिया सुळेंना डिवचलं!
IPL 2024 Hardik Pandya: सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण शेवटी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
सर्वाधिक धावा केल्या, शेवटपर्यंत लढला; पण पराभवासाठी त्यालाच जबाबदार धरला, हार्दिक काय म्हणाला?
Bollywood Actress : इंटिमेट सीन्सच्या विरोधात होते आई-वडील, अनेक चित्रपट नाकारले; 'लस्ट स्टोरीज 2' फेम अभिनेत्री म्हणाली,
इंटिमेट सीन्सच्या विरोधात होते आई-वडील, अनेक चित्रपट नाकारले; 'लस्ट स्टोरीज 2' फेम अभिनेत्री म्हणाली,"मला भीती वाटायची"
Embed widget