एक्स्प्लोर

Loksabha Exit Poll: भारतात पुन्हा मोदी सरकारच येणार, चीनला गॅरंटी? एक्झिट पोलच्या निकालानंतर ग्लोबल टाईम्सचे संकेत

Lok Sabha Election 2024: एक्झिट पोलच्या निकालानंतर शेअर बाजारात प्रचंड उसळी, चीनकडून भारतात मोदी सरकार येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. चीनच्या सरकारी मीडियात मोदींच्या तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शक्यता

बीजिंग: चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्सने भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी 1 जूनला सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले होते. यानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोल्स (Exit Poll 2024) जाहीर केले होते. यामध्ये देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित एनडीए आघाडीचे (NDA Alliacne) सरकार येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यानंतर चीनमधील ग्लोबल टाईम्सनेही भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येईल, असे संकेत दिले आहेत. ग्लोबल टाईम्समधील लेखात म्हटले आहे की, भारतातील एक्झिट पोल्सचा अंदाज पाहता नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ शकतात. चिनी विश्लेषकांच्या मतानुसार, पंतप्रधान मोदी देशांतर्गत आणि विदेशी धोरणे कायम राहतील. देशाच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु राहतील, असेही ग्लोबल टाईम्समध्ये म्हटले आहे.

भारतात पुन्हा एकदा मोदी सरकार आल्यास चीनकडून भारताशी द्विपक्षीय संबंध सुरळीत राखण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत. भारताशी काही मुद्दयांवरुन असलेले मतभेद दूर करण्याच्यादृष्टीने आणि संवाद सुरळीत ठेवण्यासाठी चीनकडून आगामी काळात भर दिला जाण्याची शक्यता आहे. 

भारताचे परराष्ट्र धोरण आणखी बळकट होणार

ग्लोबल टाईम्समधील लेखात नमूद केल्याप्रमाणे, पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आल्यास ते पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होणारे दुसरे भारतीय नेते ठरतील. मोदी सत्तेत आल्यास भारताचे परराष्ट्र धोरण आणखी बळकट होईल. तसेच गेल्या काही काळापासून अंमलबजावणी करण्यात येणारेच परराष्ट्र धोरण कायम राहील. येत्या काही वर्षांमध्ये अमेरिका आणि चीननंतर सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याच्यादृष्टीने मोदी सरकारकडून भर दिला जाईल, असा अंदाज चिनी विश्लेषकांनी वर्तविला आहे. 

एबीपी सी वोटर एक्झिट पोल

महायुती

भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 

महाविकास आघाडी

ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1

एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12

आणखी वाचा

एक्झिट पोल्समध्ये देशात पुन्हा मोदी सरकारचा अंदाज, शेअर बाजार उघडताच मोठी उसळी, सेन्सेक्स 2200 अंकानी वधारला

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Sanap Pune Election : अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
अखेर पुणे शिक्षक मतदारसंघाचा सस्पेन्स संपला; महायुतीत मैत्रीपूर्ण लढत होणार, शिवसेनेसह भाजपही निवडणूक लढवणार, नेमकं काय ठरलं?
Sachin Sanap Pune Election : पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
पुणे पदवीधरवरून शिवसेनेत नाराजी; दुसरीकडे शिक्षक मतदारसंघात अपक्ष उमेदवार सचिन सानपांची मोठी राजकीय लॉबी; सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीवर प्रतिक्रिया, म्हणाले 'मला सांगितलं गेलंय की...'
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
काम आपण करतो, पण ज्ञानेश कुमारांच्या कृपेने दुसरेच निवडून येतात; शर्मिला ठाकरेंचा निवडणूक आयुक्तांवर हल्लाबोल
Pune Graduate Election : 'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार
'शनिवारवाड्यावर डिबेट ठेवा, उमेदवारांची लायकी स्पष्ट होऊ द्या', जयंत पाटलांचे महायुतीला उघड आव्हान; विधान परिषदेची निवडणूक रंगतदार

व्हिडीओ

Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody
Rahul Gandhi Special Report : राहुल गांधींनी धक्का दिल्याचा महिला पत्रकाराचा आरोप; भाजपाचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
मन हेलावणारी घटना, खाडीतील पाण्यात बुडून 4 मुलांचा मृत्यू; 2 दिवसापासून एकाच्या मृतदेहासाठी शोधमोहीम सुरू
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
शासनाच्या 108 अन् 102 च्या सेवेचं एकत्रीकरण होणार, नव्याने 4,500 रुग्णवाहिका सेवेत; आरोग्यमंत्री आबिटकरांची माहिती
Dhruv Rathee : आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
आंदोलनासाठी भारतात आलेल्या ध्रुव राठीला सरकार अडकवणार? 2018 सालची फाईल उघडली, कोर्टाकडून नवीन समन्स जारी
प्रत्येक रेल्वे तिकिटावर विमा सुविधा देणं बंधनकारक, सुप्रीम कोर्टाचे भारतीय रेल्वेला आदेश, 27 ऑक्टोबरपासून नवा नियम लागू होणार
मोठी बातमी, रेल्वे काऊंटरवरुन खरेदी केलेल्या तिकिटाला विमा सुविधा द्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश
Mhada Pune Lottery : पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
पुणेकरांसाठी गुड न्यूज, म्हाडाच्या 4462 घरांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ, 'या' तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी
Raju Shetti : राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, महामार्गावरील आंदोलन बंद, आता कारखाने बंद पाडणार
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
अंजली पाटीलच्या ‘सेल्वी’ चित्रपटाची आंतरराष्ट्रीय भरारी; दोन प्रतिष्ठित पुरस्कारांवर कोरले नाव
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादी पक्षाच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
मोठी बातमी! भिवंडीत राजकीय भूकंप, समाजवादीच्या 6 नगरसेवकांची पक्षातून हकालपट्टी; स्वीकृत निवडीवरुन वाद
Embed widget