ठाकरे बंधूंना फक्त भावनात्मक बोलायचंय, पण देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच फॉर्म्युला चालणार, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भावनात्मक मते मागायची आहेत. महाराष्ट्रातील जनता विकासाला मत देते असं म्हणत मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.
Chandrashekhar Bawankule : महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना भावनात्मक मते मागायची आहेत. महाराष्ट्रातील जनता विकासाला मत देते. कुटुंब एकत्र आलेच पाहिजे असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. राज ठाकरे ईव्हीएम, मशीन चोरी वर बोलले. पण ते काहीच चालत नसल्यामुळे असं बोलत असल्याचे बावनकुळे म्हणाले. पंचवीस वर्ष तुमचा महापौर होता. मुख्यमंत्री पद होतं. त्यावेळेस तुम्ही काय केलं? असा टोला बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला. तुम्हाला मुंबईचा खराच विकास करायचा असेल तर विजन डॉक्युमेंट द्या. त्यांच्याकडे काहीही प्लॅन नाही त्यांना फक्त भावनात्मक बोलायचं आहे. डेव्हलपमेंट म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस म्हणजे डेव्हलपमेंट हाच फार्मूला चालणार असल्याचे बावनकुळे म्हणाले. ते लातूरमध्ये बोलत होते.
आम्ही अंतिम निर्णय स्वीकारणारी लोकं
चंद्र सूर्य असतील तोपर्यंत देवेंद्र फडणीस यांना दिल्लीचा ऐकावं लागेल असे राज ठाकरे म्हणाले होते, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, आमचा पक्ष आहे पक्षाची शिस्त आहे सर्वात मोठा पक्ष आहे रस्त्यावरचा पक्ष थोडीच आहे. या पक्षाला एक भूमिका आहे. आम्ही अंतिम निर्णय स्वीकारणारी लोकं आहोत. आतापर्यंत भाजपाच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणीस यांनी घेतलेल्या निर्णय केंद्र सरकारने पूर्ण केला आहे. केंद्र सरकारचा निर्णय देवेंद्र फडणवीस पूर्ण करतात असेही बावनकुळे म्हणाले.
लोक आम्हाला मते देतील. विरोधी पक्ष किंचित झालेला दिसेल
आमचं सरकार मजबूत आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अजित दादा पवार एकत्र काम करतील.आम्ही समन्वय समितीत निर्णय घेतला त्यावेळेस उदय सामंत ते हजर होते. पंधरा ठिकाणी आम्ही एकदा आलोय काही ठिकाणी आमची मैत्री पूर्ण लढत आहे असे बावनकुळे म्हणाले. सर्वत्र म्हणजे 29 महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाचे सरकार दिसेल असा दावा देखील बावनकुळे यांनी केला आहे. लोक आम्हाला मते देतील. विरोधी पक्ष किंचित झालेला दिसेल असा टोला बावनकुळे यांनी लगावला. दरम्यान, येत्या 15 जानेवारीला महानगरपालिका निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी जोरदार प्रतचाराला सुरुवात केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:




















