एक्स्प्लोर
लोकसभेसाठी साताऱ्यात उदयनराजेंविरोधात भाजपकडून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी?
सातारा, वाई, कोरेगाव, पाटण इथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे.
![लोकसभेसाठी साताऱ्यात उदयनराजेंविरोधात भाजपकडून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी? BJP may give candidateship to Mathadi leader Narendra Patil from Satara Loksabha constituency लोकसभेसाठी साताऱ्यात उदयनराजेंविरोधात भाजपकडून नरेंद्र पाटील यांना उमेदवारी?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/02/21074739/Udayanraje_Narendra-Patil.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना आणि भाजप युती झाल्यानंतर आता आगामी लोकसभा निवडणुकीत कोणाला कोणत्या जागेवर उमेदवारी द्यायची याची लगबग सुरु आहे. सातारा मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार नरेंद्र पाटील यांचं नाव समोर येत आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना लोकसभेसाठी उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. नरेंद्र पाटील याआधी विधानपरिषदेचे आमदार होते.
नरेंद्र पाटील माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे पुत्र आहेत. सातारा, वाई, कोरेगाव, पाटण इथे माथाडी मतदारांवर नरेंद्र पाटील यांची पकड आहे. मराठा मोर्चे निघाला होते, त्यात सातारा पट्ट्यातील लोकांचा सर्वाधिक समावेश होता. त्यामुळे ही मतं नरेंद्र पाटील यांना मिळतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे साताऱ्यात उदयनराजेंविरोधात भाजपकडून नरेंद्र पाटील रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने यांना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकासमंडळाचं अध्यक्षपद दिल्यानंतर नरेंद्र पाटील राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला होता.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने सातारा मतदारसंघ हा रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला दिला होता. परंतु यंदाच्या निवडणुकीत ही जागा भाजपकडेच राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता रामदास आठवले काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)