एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
माढ्यातील भाजपचा उमेदवार ठरला, उमेदवारांची बारावी यादी जाहीर
माढ्यात आता भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे असा सामना रंगणार आहे.
![माढ्यातील भाजपचा उमेदवार ठरला, उमेदवारांची बारावी यादी जाहीर BJP gives ticket to Ranjitsinh Naik Nimbalkar from Madha constituency माढ्यातील भाजपचा उमेदवार ठरला, उमेदवारांची बारावी यादी जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/29082122/Ranjitsinh-Naik-Nimbalkar-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : भाजपचा माढ्यातील उमेदवार कोण हे अखेर स्पष्ट झालं आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच भाजपचे माढ्यातील अधिकृत उमेदवार असतील. त्यामुळे विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उमेदवारीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. माढ्यात आता भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे असा सामना रंगणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आज उमेदवारांची बारावी यादी जाहीर केली. या यादीत देशभरातील 11 उमेदवारांचा समावेश असून त्यात रणजिसिंह नाईक निंबाळकर हे महाराष्ट्रातील एकमेव नाव आहे. यादीत कर्नाटकातील 3, मध्य प्रदेशातील 3, राजस्थानमधील 3, जम्मू काश्मीरमधील 1 आणि महाराष्ट्रातील एका उमेदवाराचं नाव आहे.
रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसचे सातारा जिल्हा अध्यक्ष होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.
मोहिते-पाटील कुटुंबातील सदस्यांना उमेदवारी मिळत नसल्याचं चित्र पाहून रणजितसिंह मोहिते पाटलांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यामुळे माढ्यातून कोणाला उमेदवारी मिळणार याबाबत सर्वांच्या मनात उत्सुकता होती. भाजपकडून रणजितसिंह मोहिते पाटलांना उमेदवारी मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र चंद्रकांत पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लोकसभेच्या मैदानात उतरवणार असल्याचं सांगितलं होतं. मात्र त्यानंतर भाजपने माढ्यात केलेल्या सर्वेक्षणात विजयसिंह मोहिते पाटील यांचं नाव आघाडीवर असल्याचं समोर आलं. त्यामुळे माढ्यातील उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. पण आता भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच उमेदवारी दिली. मात्र आता रणजितसिंह मोहिते पाटील यांचं काय होणार हे पाहावं लागेल.
कोण आहेत रणजितसिंह नाईक निंबाळकर?
- सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष
- अडीच महिन्यांपूर्वी जिल्हाध्यक्षपदी निवड
- खासदार हिंदुराव नाईक निंबाळकरांचे चिरंजीव
- स्वराज उद्योग समुहाची स्थापना
- स्वराज्य उद्योग समुहातून युवकांची फौज
- 1996 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीकडून हिंदुराव नाईक निंबाळकरांना उमेदवारी
लोकसभा निवडणूक : महाराष्ट्रातील सध्याचं पक्षीय बलाबल आणि खासदारांची संपूर्ण यादी
कोण आहेत संजय शिंदे?
- शिवसेना-भाजपच्या मदतीने सध्या सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष आहेत.
- माढा राष्ट्रवादी आमदार बबनदादा शिंदे यांचे लहान भाऊ आणि मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात.
- निमगाव 'टेंभुर्णी'च्या सरपंचपदापासून राजकारणाला सुरुवात
- 2014 च्या निवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करमाळा विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव
- जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले.
- पालकमंत्री विजय देशमुख यांच्या मदतीने अध्यक्ष झाले.
- म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन या साखर कारखान्याचे अध्यक्ष आणि विठ्ठल सूतगिरणीचे अध्यक्ष.
- माढा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन-जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष
- जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पद, माढा तालुका पंचायत समितीचे सभापतीपदही भूषवलं.
VIDEO | भाजपमध्ये मोहिते पाटलांच्या तिकीटाआड कोण आलं?
संबंधित बातम्या
माढ्यात भाजपकडून विजयसिंह मोहिते पाटील यांची घोषणा होणार?
विजयसिंह मोहिते-पाटलांच्या आशीर्वादने रणजितसिंह भाजपमध्ये, मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी मुकाबला होणार
काँग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपच्या संपर्कात
विजयसिंह मोहिते-पाटील राष्ट्रवादी सोडणार नाही, सुनील तटकरेंचा विश्वास
![माढ्यातील भाजपचा उमेदवार ठरला, उमेदवारांची बारावी यादी जाहीर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/29134832/BJP-LIST.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
शेत-शिवार
राजकारण
क्रीडा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)