एक्स्प्लोर

Maharashtra Politics: राज्यात राजकीय घडामोडींना वेग! विधानभवनात कोअर कमिटीची बैठक; भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवड कशी होणार?

Maharashtra Politics: भाजपचा गटनेता कोण असणार हे आज या बैठकीमध्ये ठरणार आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आज होत आहे. विधानभवनात ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

मुंबई: राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून जवळपास 10 ते 12 दिवस झाले आहेत. तेव्हापासून राज्यात सरकार स्थापनेबाबातच्या घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून अद्याप पेच सुरू आहे. आज (बुधवारी) महायुतीकडून सत्तास्थापनेचा दावा केला जाणार असल्याची माहिती आहे. सत्ता स्थापनेचा दावा करण्यापूर्वी भाजपच्या गटनेत्याची निवड केली जाणार आहे. त्या अनुषंगाने बैठक सुरू आहे. यासाठी भाजपच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक पार पडत आहे. गटनेता पदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झाल्याची देखील चर्चा सुरू आहे. (BJP Core Committee meeting at Legislative Hall How will BJPs legislative group leader be selected)

भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरू आहे. या बैठकीसाठी भाजपचे नेते विधानभवनात दाखल होता आहेत. केंद्रीय निरीक्षकही बैठकीला दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी भाजपकडून निरीक्षक विजय रुपाणी, निर्मला सीतारमण हे कालच मुंबईत दाखल झाले आहेत. भाजपच्या गटनेता निवडीनंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार आहे. या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अन्य नेते दाखल झाले आहेत. 

भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवड कशी होणार? 

केंद्रीय निरीक्षक निर्मला सीतारमण आणि विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत विधिमंडळ गटनेते निवडीची बैठक पार पडेल.

भाजपचे 132 विजयी आमदार यासोबतच भाजपला पाठिंबा असणारे अपक्ष आमदार उपस्थित असतील.

भाजप - मित्रपक्षाचा विधिमंडळ गटनेता कोण असावा याबद्दलचा प्रस्ताव भाजपतील जेष्ठ नेता ठेवणार आहेत.

चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, मंगलप्रभात लोढा या जेष्ठ्य आमदारांपैकी एक जण प्रस्ताव मांडू शकतो.

केंद्रीय निरीक्षक या प्रस्तावावर उपस्थित आमदारांचं मत जाणून घेतील.

उपस्थित आमदारांपैकी प्रमुख जेष्ठ आमदार या प्रस्तावावर आपलं अनुमोदनपर मत जाहीर करतील.

गटनेत्याच्या नावावर बहुमतानं शिक्कामोर्तब झाल्यानंतर केंद्रीय निरीक्षक भाजप गटनेत्याच नाव जाहिर करतील. 

उपस्थित आमदारांपैकी जेष्ठ आमदार नियुक्त गटनेत्याबद्दल आपलं मत व्यक्त करतील.

गटनेता निवड झाल्यानंतर महायुतीच्या सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग येईल. 

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नावाचा प्रस्ताव विधिमंडळाच्या बैठकीत मांडला जाणार असल्याची माहिती आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील हे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव मांडणार आहेत. रणधीर सावरकर हे गटनेता निवड बैठकीत संचलन करतील त्यानंतर सुधीर मुनगंटीवार व चंद्रकांत पाटील हे प्रस्ताव मांडतील. त्यानंतर रविंद्र चव्हाण प्रस्तावाला अनुमोदन देतील अशी माहिती आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM : 10 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सKurla Bus Accident : कुर्ला बस दुर्घटनेप्रकरणी ड्रायव्हर संजय मोरेला 21 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 06 PM : 10 डिसेंबर 2024: ABP MajhaFake Medicine Scam : विशाल एंटरप्राईजेसकडून पुरवठा होणाऱ्या औषधांचा वापर थांबवण्याच्या सूचना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satish Wagh Murder Case : आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
आमदार योगेश टिळेकरांच्या मामांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट; पुणे पोलिसांकडून दोघा संशयितांना अटक
Pune Crime : धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
धक्कादायक! बांगलादेशी व्यक्तीने पुण्यात जागा घेऊन घरही बांधले, 500 रुपयात बनावट आधारकार्ड काढलं
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
जालन्यातील लाडक्या भावाने 7500 रुपये केले परत; लाडकी बहीण योजनेचा मिळाला होता लाभ
JCB full form : खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
खोदकाम आवडीने पाहता, पण JCB चा फुल फॉर्म माहिती आहे का?
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
गडकरींच्या ऑफिसमधून बोलतोय; आमदार प्रसाद लाड यांना जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत फिर्याद
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
आरोपींना लगेच जामीन कसा मिळाला, शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना अस झालं नव्हतं; सोनवणेंचा सवाल
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
पेपरफुटीवर बसणार चाप! MBBS पेपर फुटीप्रकरणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाने घेतला मोठा निर्णय; आता...
Beed Crime : धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
धक्कादायक... बीडमध्ये 24 तासात दोन अपहरणाच्या घटना, व्यापाऱ्याकडून उकळली लाखोंची खंडणी, पोलिसांचा धाक संपला?
Embed widget