Bihar Election 2025 Opinion Poll: बिहारचा ओपिनियन पोल समोर, एनडीएला छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; महागठबंधनला किती जागा मिळणार?, A टू Z माहिती
Bihar Election 2025 Opinion Poll: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी 6 नोव्हेंबर 2025 121 जागांसाठी मतदान होणार आहे.

Bihar Election 2025 Opinion Poll: बिहार विधानसभा निवडणुकीच्या (Bihar Election 2025) पहिल्या टप्प्यासाठी गुरुवारी (6 नोव्हेंबर 2025) 121 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी जाहीर झालेल्या अनेक ओपिनियन पोलमध्ये (Bihar Election 2025 Opinion Poll) एनडीएला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल ऑफ पोल्समध्ये एनडीए (NDA) सरकार स्थापन (Nitish Kumar) करेल असा अंदाज आहे. एनडीएला 143, महागठबंधनला (MahaAghadi) 95 आणि इतरांना 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
IANS-MATRIZE च्या ओपिनियन पोलमध्ये अंदाज काय? (IANS-MATRIZE Bihar Opinion Poll)
IANS-MATRIZE च्या ओपिनियन पोलनुसार, एनडीए पुन्हा एकदा बिहारमध्ये सत्ता स्थापन करेल. सर्वेक्षणानुसार, राज्यातील 243 जागांपैकी एनडीएला 153-164 जागा आणि महागठबंधनला 76-87 जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे. ओपिनियन पोलनूसार भाजपला 83-87 जागा मिळतील, तर जेडीयूला 61-65 जागा, एचएएमला 4-5 जागा, लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) 4-5 जागा आणि उपेंद्र कुशवाह यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाला 1-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
IANS-MATRIZE च्या ओपिनियन पोलनूसार महागठबंधनला किती जागा मिळणार? (Bihar Election 2025 Opinion Poll)
महागठबंधनबद्दल, सर्वेक्षणात आरजेडीला सर्वाधिक जागा मिळण्याचा अंदाज आहे, ज्यामध्ये 62-66 जागा, त्यानंतर काँग्रेसला 7-9 जागा, सीपीएम (एमएल) 6-8 जागा, सीपीआयला 0-1, सीपीएम (मार्क्सवादी) 0-1 आणि व्हीआयपीला 1-2 जागा मिळतील. तसेच असदुद्दीन ओवेसी यांच्या एआयएमआयएमला 1-2 जागा आणि प्रशांत किशोर यांच्या जनसूरज पक्षाला 1-3 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर पोलस्ट्रॅटच्या जनसूरज पक्षाला 1-3 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
चाणक्य स्ट्रॅटेजीज सर्व्हेचा अंदाज काय? (CHANAKYA STRATEGIES OPINION POLL)
चाणक्य स्ट्रॅटेजीज सर्व्हेमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. CHANAKYA STRATEGIES सर्व्हेनुसार, एनडीएला 130 पेक्षा जास्त जागा आणि महागठबंधनला 110 पेक्षा कमी जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर इतरांना 5 ते 9 जागा मिळू शकतात.
पोलस्ट्रॅटच्या पोलचा अंदाज काय, एनडीए की महागठबंधन? (Bihar Election Opinion Poll)
पोलस्ट्रॅटच्या पोलनूसार, बिहारमध्ये 133 ते 143 जागा मिळण्याची शक्यता आहे. या सर्वेक्षणात भाजपला 70 ते 72 जागा मिळतील. तर विरोधी पक्षांच्या महाआघाडीला 93 ते 102 जागा मिळतील. माहितीनुसार, प्रशांत किशोर यांचा जनसूरज पक्षही बिहारमध्ये आपले खाते उघडू शकतो, ज्यामध्ये एक ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये दोन टप्प्यात मतदान- (Bihar Election 2025)
दरम्यान, बिहार विधानसभा निवडणूक दोन टप्प्यात पार पडणार आहे. 6 नोव्हेंबर आणि 11 नोव्हेंबर या दोन दिवशी मतदान होणार आहे. तर, 14 नोव्हेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे. बिहारमध्ये एनडीए आणि महागठबंधन आमने सामने येणार आहेत. एनडीएमध्ये जनता दल संयुक्त आणि भाजप हे प्रमुख पक्ष आहेत.





















