एक्स्प्लोर
Advertisement
भारिप बहुजन महासंघ वंचित आघाडीत विलीन करणार, प्रकाश आंबेडकरांची घोषणा
पुढच्या सर्व निवडणुका वंचित बहूजन आघाडीच्या झेंड्याखाली लढणार असल्याचंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.
अकोला :
राज्याच्या राजकारणात गेल्या दोन दशकांत तिसरा राजकीय पर्याय असणारं 'भारिप-बहूजन महासंघ' हे नाव आता इतिहासजमा होणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर 'भारिप-बहूजन महासंघ' आंबेडकरांच्या नेत्रूत्वात तयार झालेल्या 'वंचित बहूजन आघाडी'त विसर्जित करणार असल्याचं आज प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केलं आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते.
पक्ष विसर्जित करण्याची प्रक्रिया लोकसभा निवडणुकीनंतर सुरु करणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. प्रकाश आंबेडकरांच्या या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणातल्या रिपब्लिकन चळवळीतील 'भारिप-बहूजन महासंघ' नावाचं 'पर्व' संपणार आहे.
आंबेडकरांनी या निर्णयातून आपल्या राजकीय कक्षा रुंदावण्याचा प्रयत्न केला आहे. 'रिपब्लीकन' नावातून एकाच समाजाचं नेत्रूत्व करण्यापेक्षा 'बहूजन' नावाने सर्वांना सोबत घेण्याच्या दृष्टीने आंबेडकरांनी हा निर्णय घेतला असावा. त्यामूळे 'वंचित बहूजन आघाडी' ही प्रकाश आंबेडकरांची नवी राजकीय ओळख त्यांना खरंच राजकीय ताकद देणारी ठरेल का याचं उत्तर येणारा काळच देईल.
VIDEO | प्रकाश आंबेडकर लवकरच भारिप बहुजन पक्ष वंचित आघाडीत विलीन करणार | अकोला | एबीपी माझा
‘भारिप-बहूजन महासंघा’चा संपूर्ण प्रवास
प्रकाश आंबेडकरांनी 1983 मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्ष अर्थातच 'भारिप'ची स्थापना केली होती. पुढे 1993 मध्ये मखराम पवारांचा 'बहूजन महासंघ' भारिपमध्ये विलिन झाल्यानंतर 'भारिप-बहूजन महासंघ' हे नाव महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर अधिक ताकदीने पुढे आलं.
राजकारणातील 'सोशल इंजिनिअरींग'चा पहिला प्रयोग याच पक्षाने करत राज्यात 'अकोला पँटर्न' नावाने रुढ केला. त्याआधी याच सोशल इंजिनिअरींगचा प्रयोग करीत नांदेड जिल्ह्यातील किनवट विधानसभेच्या पोटनिवडणुकीत या पक्षानं इतिहास घडवला. भिमराव केराम नावाच्या आदिवासी युवकाला आमदार म्हणून निवडून आणत प्रकाश आंबेडकरांनी खळबळ उडवून दिली. पुढे अकोला हे 'भारिप-बहूजन महासंघा'च्या राजकारणाचं केंद्र बनलं.
भारिप-बहूजन महासंघ पक्षाच्या तिकिटावर आंबेडकर 1998 आणि 1999 मध्ये अकोल्यातून लोकसभेत निवडून गेले होते. 1999 च्या निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करीत भारिपचे तीन आमदार विधानसभेत निवडून गेले. पुढे विलासराव देशमुख आणि सुशीलकुमार शिंदेच्या मंत्रिमंडळात या पक्षाला तीन मंत्रिपदं मिळाली होती.
गेल्या वीस वर्षांपासून अकोला जिल्हा परिषद भारिपच्या ताब्यात आहे. या विधानसभेत भारिपचा एक आमदार आहेय. तर गेली अडीच दशके भारिप- बहुजन महासंघ वऱ्हाडच्या सीमा ओलांडून बाहेर जायला तयार नाही आहे. इतर अठरापगड जातींना सोबत घेतल्याशिवाय सत्तेचा सोपान चढणे शक्य नाही हे लक्षात आल्यावर आंबेडकर यांनी ” वंचित बहुजन आघाडी” स्थापन करून लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला. या आघाडीत जवळपास 100 छोटे पक्ष आणि सामाजिक संघटना सहभागी झाल्या. प्रत्येक जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या रेकॉर्ड ब्रेक सभा व्हायला लागल्यावर हाच फार्म्युला उत्तम असल्याचे पटल्यावर आंबेडकरांनी यापुढील सर्व निवडणूका वंचित बहुजन आघाडी या नावाने लढवण्याचा निर्णय घेतला.
संबंधित बातम्या
काँग्रेससोबत चर्चेचे पर्याय संपले, पुढे जाणं शक्य नाही : प्रकाश आंबेडकर
सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंना प्रकाश आंबेडकरांचं आव्हान
वंचित बहुजन आघाडीची काँग्रेस-राष्ट्रवादीकडे जाहीर केलेल्या 22 जागांची मागणी
मला ट्रोल करणाऱ्यांना ठोकून काढा : प्रकाश आंबेडकर
राहुल गांधी- प्रकाश आंबेडकर यांची भेट होण्याची शक्यता, काँग्रेस-राष्ट्रवादीचं आंबेडकरांना पत्र
प्रकाश आंबेडकर लोकसभा निवडणूक लढवणार, मतदारसंघाबाबत म्हणतात...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement