(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीडमध्ये मतमोजणीचा हायव्होल्टेज ड्रामा, पंकजा मुंडे-बजरंग सोनावणेंची धाकधूक कायम, आता शरद पवारांची एन्ट्री, म्हणाले...
Beed Lok Sabha Election: बीडमध्ये सुरू असलेल्या हाय व्होल्टेज लढतीत आता शरद पवारांची एन्ट्री झाले. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
Beed Lok Sabha Election: मराठा आंदोलनामुळे (Maratha Reservation) हिंसेची धग बसलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात कोण निवडून येणार,याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलेय. भाजपकडून पंकजा मुंडे (Pankaja Munde) तर शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांच्यामध्ये अटीतटीचा सामना सुरु आहे. पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांच्यातील फरक खूपच कमी आहे. अखेरच्या फेरीनंतर बीडचा खासदार कोण? हे स्पष्ट होणार आहे. त्यात पंकजा मुंडेंनी फेर मतमोजणीची मागणी केली आहे. राज्यात सर्वात हाय व्होल्टेज आणि जातीय रंग लागल्याने चर्चेत ठरलेली लढत बीड लोकसभा मतदारसंघात झाली. आता बीडमध्ये सुरू असलेल्या हाय व्होल्टेज लढतीत आता शरद पवारांची एन्ट्री झाले. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.
शरद पवार म्हणाले, बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे.
बीडमध्ये पहिल्या फेरीपासूनच चुरस पाहायला मिळत आहे. पंकजा मुंडे यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदारसंघात फेरमतमोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी फेरमतमोजणी मागणी करण्यात आली. कधी पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली, तर कधी बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनंतर चित्र बदलत गेले. उमेदरांसोबत कार्यकर्त्यांमध्येही धाकधूक वाढली होती. 32 व्या फेरीनंतर बीडमधील चित्र स्पष्ट झाले.
बीड जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिस महासंचालकांनी प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवावे. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे सत्वर लक्ष पुरवावे. @DGPMaharashtra @CollectorBeed @ECISVEEP
— Sharad Pawar (@PawarSpeaks) June 4, 2024
अखेरच्या फेरीमध्ये पाटोदा ताल्यातील 20 गावांनी बीडचा खासदार ठरवला. बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असताना या मतमोजणीने नाट्यमय वळण घेतले आहे. केवळ दोन फेरी मतमोजणीच्या बाकी असताना बजरंग सोनवणे हे दोन हजार मतांनी आघाडीवर गेले.21 व्या फेरीअखेर पंकजा मुंडे यांच्याकडे 33 हजार मतांची आघाडी होती. पण त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मुसंडी मारत ही आघाडी मोडून काढली. कधी पंकजा मुंडे आघाडीवर तर कधी बजरंग सोनणे आघाडीवर राहिले. अखेरच्या 15 फेऱ्यामध्ये बीडमधील लढत अतिशय रंजक झाली.
हे ही वाचा :
बीडमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत थरार; 'सुपर ओव्हर'लाही लाजवेल अशी राज्यातील सर्वात रोमहर्षक लढत