एक्स्प्लोर

बीडमध्ये शेवटच्या फेरीपर्यंत थरार; 'सुपर ओव्हर'लाही लाजवेल अशी राज्यातील सर्वात रोमहर्षक लढत

मराठा आरक्षण, मनोज जरांगे फॅक्टर, राष्ट्रवादीतील फूट या कारणांमुळे चर्चेत व लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात क्रिकेट सामन्यातील शेवटच्या षटकांपर्यंत व्हावी अशी चूरस दिसून आली

बीड : लोकसभा निवडणुकांच्या निकालात यंदा अनेक धक्कादायक आकडे पाहायला मिळाले असून देशात इंडिया आघाडीला व राज्यात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. राज्यातील हायव्होल्टेज लढतींपैकी असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवला असून सुनेत्रा पवार यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. त्यानंतर, राज्यात सर्वात हाय व्होल्टेज आणि जातीय रंग लागल्याने चर्चेत ठरलेली लढत बीड लोकसभा मतदारसंघात झाली. बीड, परभणी, जालना मतदारसंघात मराठा आरक्षणाचा व मनोज जरांगे फॅक्टर जाणवल्याचं दिसून आलं. बीडमध्ये पहिल्या फेरीपासूनच अत्यंत चुरस पाहायला मिळाली. त्यामध्ये, पहिल्या फेरीत बजरंग सोनवणे यांनी 1359 मतांचे मताधिक्य घेतल्याचं दिसून आलं. त्यानंतर, तिसऱ्या फेरीतही सोनवणे आघाडीवर होते. मात्र, बजरंग सोनवणे आणि पंकजा मुंडे यांच्यात शेवटच्या फेरीपर्यंत अत्यंत चुरशीची लढत पाहायला मिळाली.    

मराठा आरक्षण, मनोज जरांगे फॅक्टर, राष्ट्रवादीतील फूट या कारणांमुळे चर्चेत व लक्षवेधी ठरलेल्या बीड लोकसभा मतदारसंघात क्रिकेट सामन्यातील शेवटच्या षटकांपर्यंत व्हावी अशी चूरस दिसून आली. शेवटच्या षटकात सामना बरोबरीत सुटावा आणि सुपर ओव्हरमध्ये सामन्याचा निकाला लागावा अशीच परिस्थिती बीडमधील लोकसभेच्या निवडणूक निकालात दिसून आली. पहिल्या फेरीपासून पुढील काही फेरीपर्यंत बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली होती. मात्र, 5 ते 10 हजारांच्या फरकावर सुरू असलेल्या फेऱ्यामुळे येथील मतदारसंघात अत्यंत चुरस निर्माण झाली होती. उमेदवारांची धाकधूक आणि कार्यकर्त्यांचीही उत्कंठा शिगेला पोहोचली, ती शेवटच्या 32 व्या फेरीपर्यंत कायम राहिली. 

पंकजा मुंडेंनी बजरंग सोनवणेंची आघाडी तोडून तब्बल 43 हजारांची आघाडी घेतली होती. मात्र, 31 व्या फेरीत पुन्हा पंकजा मुंडेंचा लीड कमी होऊन बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतली. पंकजा मुडेंचा लीड कमी होऊन शेवटच्या काही फेरीत हे मताधिक्य केवळ 400 मतांवर येऊन पोहोचलं होतं. त्यामुळे, राज्यात सर्वात थरारक आणि उमेदवारांच्या काळजाचे ठोके चुकवणारी ही लढत ठरली आहे. 31 व्या फेरीत बजरंग सोनवणेंनी आघाडी घेतल्यामुळे शेवटच्या म्हणजेच 32 व्या मतमोजणीकडे सर्वांचे लागले होते. 31 व्या फेरीअखेर बजरंग सोनवणे 688 मतांनी आघाडीवर पोहोचले होते. त्यामुळे, 32 व्या फेरीत नेमकं काय होईल, याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. 

बजरंग सोनवणे यांना 31 व्या फेरीअखेर 6 लाख 74 हजार 507 मतं मिळाली आहेत. तर, पंकजा यांना 6 लाख 73 हजार 819 मतं मिळाली आहेत. त्यामुळे, पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यांच्यातील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची धाकधूक सर्वांना लागली होती. पंकजा मुंडेंनी 31 व्या फेरीनंतर माध्यमांशी बोलताना माझे मताधिक्य 40 हजारांहून कमी कमी होत 400 पर्यंत आल्याचं म्हटलं. तसेच, पुढच्या अंतिम फेरीत काय होईल हेही मला माहिती नाही, असेही त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 

पाटोदा तालुक्यातील गावांची निर्णायक भूमिका 

पहिल्या फेरीपासून बीड लोकसभा मतदारसंघात चुरस पाहायला मिळाली. कधी पंकजा मुंडे यांनी आघाडी घेतली, तर कधी बजरंग सोनवणे यांनी आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनंतर चित्र बदलत गेले. उमेदरांसोबत कार्यकर्त्यांमध्येही धाकधूक वाढली होती. 32 व्या फेरीनंतर बीडमधील चित्र स्पष्ट होईल. अखेरच्या फेरीमध्ये पाटोदा ताल्यातील 20 गावांनी बीडचा खासदार ठरवला, असे म्हणता येईल. बीड लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अंतिम टप्प्यात असताना या मतमोजणीने नाट्यमय वळण घेतले आहे. केवळ दोन फेरी मतमोजणीच्या बाकी असताना बजरंग सोनवणे हे दोन हजार मतांनी आघाडीवर गेले.

पंकजा मुंडेंची 38 हजारांची आघाडी बजरंग सोनवणेंनी मोडून काढली 

22 व्या फेरीअखेर पंकजा मुंडे यांच्याकडे 38 हजार मतांची आघाडी होती. पण त्यानंतर बजरंग सोनवणे यांनी मुसंडी मारत ही आघाडी मोडून काढली. कधी पंकजा मुंडे आघाडीवर तर कधी बजरंग सोनणे आघाडीवर राहिले. अखेरच्या 15 फेऱ्यामध्ये बीडमधील लढत अतिशय रंजक झाली.

बीड लोकसभा मतदारसंघाची नाट्यमय मतमोजणी 

पहिली फेरी - बंजरंग सोनवणे 1359 मतांनी आघाडीवर

दुसरी फेरी - बजरंग सोनवणे 2349 मतांनी आघाडीवर  

सहावी फेरी - बजरंग सोनवणे 1387 मतांनी आघाडीवर 

सातवी फेरी - बजरंग सोनवणे 203 मतांनी आघाडीवर 

दहावी फेरी - पंकजा मुंडे 11955 मतांनी आघाडीवर

11 वी फेरी - पंकजा मुंडे 2111 मतांनी आघाडीवर

12 वी फेरी - बजरंग सोनवणे 1644 मतांनी आघाडीवर 

13 वी फेरी - बजरंग सोनवणे 6473 मतांनी आघाडीवर

15 वी फेरी - पंकजा मुंडे 3093 मतांनी आघाडीवर 

18 वी फेरी - पंकजा मुंडे 24099 मतांनी आघाडीवर 

19 वी फेरी - पंकजा मुंडे 24361 मतांनी आघाडीवर 

20 वी फेरी - पंकजा मुंडे 16482 मतांनी आघाडीवर 

21 वी फेरी - पंकजा मुंडे 33623 मतांनी आघाडीवर

22 वी फेरी - पंकजा मुंडे 38303 मतांनी आघाडीवर 

23 वी फेरी - पंकजा मुंडे 34705 मतांनी आघाडीवर 

24 वी फेरी - पंकजा मुंडे 30461 मतांनी आघाडीवर 

25 वी फेरी - पंकजा मुंडे 22421 मतांनी आघाडीवर 

26 वी फेरी - पंकजा मुंडे 10276 मतांनी आघाडीवर

27 वी फेरी - पंकजा मुंडे 7408 मतांनी आघाडीवर 

28 वी फेरी - बजरंग सोनवणे 932 मतांनी आघाडीवर 

29 वी फेरी - बजरंग सोनवणे 1217 मतांनी आघाडीवर

30 वी फेरी - बजरंग सोनवणे 2602 मतांनी आघाडीवर

31 वी फेरी - बजरंग सोनवणे 2688 मतांनी आघाडीवर

फेरमतदानाची मागणी

दरम्या, बीडमधील अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्याकडून बीड विधानसभा मतदारसंघ आणि गेवराई विधानसभा मतदार संघात फेरमतदान घेण्याची मागणी केली. पंकजा मुंडेंचे प्रतिनिधी वाल्मीक कराड यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र, निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी ही मागणी सपशेल फेटाळून लावली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget