10 राज्ये आणि 96 जिल्ह्यात मतदान, 'या' राज्यात बँका राहणार बंद
देशातील 10 राज्यांतील 96 जिल्ह्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निमित्ताने या सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आली आहे.
Bank Holiday : सध्या देशात लोकसभा निवडणुकांची (Loksabha Election) रणधुमाळी सुरु आहे. सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचार सुरुय. आत्तापर्यंत देशात तीन टप्प्यात लोकसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आज चौथ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडत आहे. देशातील 10 राज्यांतील 96 जिल्ह्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निमित्ताने या सर्व जिल्ह्यांमध्ये बँकांना सुट्टी देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) सरकारनं संपूर्ण राज्यात सरकारी सुट्टी जाहीर केली आहे.
10 राज्यांतील 96 जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू
आज देशात चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीय. 10 राज्यांतील 96 जिल्ह्यांमध्ये मतदान सुरू झाले आहे. या मतादानाच्या दिवशी तुम्हाला जर बँकेच्या संबंधित काही काम करायचे असेल तर तुम्ही ही यादी तपासून घराच्या बाहेर पडा. अन्यथा त्रासाला सामोर जावं लागेल. आज ज्या ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, त्या ठिकाणच्या बँकांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
कोणत्या राज्यांमध्ये होत आहे मतदान?
आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीरमध्ये चौथ्या टप्प्यात मतदान होत आहे. दुसरीकडे, लोकसभा निवडणूक 2024 च्या 5 व्या टप्प्यात, 8 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे. आज महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्यातील नंदुरबार, जळगांव, रावेर, शिर्डी, अहमदनगर दक्षिण, पुणे, शिरूर, मावळ, बीड , जालना, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी अत्यंत चुरशीच्या लढती या टप्प्यात होत आहेत. दरम्यान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या संपूर्ण राज्यात आज बँका बंद राहणार आहेत. कानपूर आणि श्रीनगरमध्ये बँका बंद राहणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने तीन श्रेणींमध्ये बँक सुट्ट्या अधिसूचित केल्या आहेत. ज्यामध्ये निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्ट सुट्टी, रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट सुट्टी आणि बँक खाते बंद करणे समाविष्ट आहे.
महाराष्ट्रातून हे महत्वाचे नेते निवडणुकीच्या मैदानात
जालना मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, शिरुरमधून अमोल कोल्हे, मावळमधून श्रीरंग बारणे, अहमदनगर दक्षिणमधून सुजय विखे, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, रावेरमधून रक्षा खडसे, नंदुरबारमधून डॉ. हिना गावित,छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील हे विद्यमान खासदार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
महत्वाच्या बातम्या: