एक्स्प्लोर

Sharad Pawar & BJP Talks: शरद पवार गट भाजपसोबत जाण्याच्या हालचाली, अदानींच्या घरी बैठक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातून पहिली प्रतिक्रिया, नेता म्हणाला...

Sharad Pawar talks with BJP: शरद पवार हे भाजपसोबत हातमिळवणी करुन सत्तेत सामील होऊ शकतात, अशी जोरदार चर्चा सुरु आहे. गौतम अदानींच्या घरी बैठक.

मुंबई: विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाल्यानंतर शरद पवार आणि भाजपमध्ये एकत्र येण्यासंदर्भात पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. शरद पवार यांचा गुरुवारी वाढदिवस होता. यानिमित्ताने अजित पवार यांनी शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. 10 दिवसांपूर्वी अजितदादा गटाचे नेते प्रफुल पटेल यांनीही शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतल्याचे सांगितले जाते. त्यानंतर गुरुवारी दुपारी दिल्लीत उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या घरी शरद पवार गटाचा एक बडा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शरद पवार हे भाजपशी हातमिळवणी करणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते मेहबुब शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मेहबुब शेख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना हे वृत्त निराधार असल्याचे सांगत फेटाळून लावले.

शरद पवार गटाचा नेता आणि भाजपच्या केंद्रीय नेत्याची भेट झाल्याचे वृत्त तुम्हाला कोणी दिले, माहिती नाही. काल सकाळपासून आम्ही सगळे दिल्लीत शरद पवारांच्या 6 जनपथ निवासस्थानीच होतो. कालपासून शरद पवार कुठेही गेले नाहीत. तसेच आमच्या पक्षाचे कोणी प्रमुख नेते भाजपच्या नेत्यांना जाऊन भेटले नाहीत. शरद पवार गटात कोणतेही दोन गट किंवा वेगवेगळे मतप्रवाह नाहीत. शरद पवार जो निर्णय घेतील तोच सर्व खासदार आणि आमदारांसाठी अंतिम असेल. पण शरद पवार आणि भाजपची बोलणी सुरु असल्याच्या बातम्या कोण पेरतंय, हे माहिती नाही, असे मेहबुब शेख यांनी म्हटले.

शरद पवारांना भेटल्यानंतर आमचे सगळे नेते थेट विमानतळावर गेले: मेहबुब शेख

अजित पवार हे काल शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आले होते. त्याचा गैर अर्थ काढायची गरज नाही. भाजपसोबत झालेल्या चर्चेत आमचे कोणते नेते सहभागी होते, हे समजले तर आम्ही त्यावर बोलू शकतो. काल शरद पवार यांना भेटून आमचे सगळे प्रमुख नेते थेट विमानतळावर गेले. मात्र, आता आमचे नेते भाजपच्या नेत्यांना भेटल्याच्या बातम्या जाणीवपूर्वक पेरल्या जात आहेत. या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. यामधून काही निष्पन्न होणार नाही, या चर्चा केवळ चर्चांपुरताच मर्यादित राहतील, असा विश्वास मेहबुब शेख यांनी व्यक्त केला.

प्रुफल पटेल हे शरद पवारांना भेटले असतील तर ठीक आहे. त्या दोघांनी एकत्र काम केले आहे. पक्ष बदलला म्हणून एखाद्याशी बोलणं बंद करणे, असे राजकारण आम्ही करत नाही. विरोधी पक्षाच्या कोणत्याही नेत्याशी शरद पवारांचा सुसंवाद आहे. पण शरद पवारांची वैचारिक भूमिका वेगळी आहे, असेही मेहबुब शेख यांनी सांगितले. 

आणखी वाचा

मोठी बातमी: दिल्लीत अदानींच्या घरी भाजपचा केंद्रीय मंत्री आणि शरद पवार गटाच्या नेत्याची गुप्त भेट, महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप?

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; देवेंद्र फडणवीसांनी दिलं उदाहरण
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती
गेल्या सहा महिन्यांच्या तुलनेत सर्वाधिक सिलेंडर मार्च महिन्यात उपलब्ध; पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी दिली माहिती

व्हिडीओ

NCL Pune labrotary : पुण्याच्या नॅशनल केमिकल लॅबोरेटरीचं मोठं संशोधन, एलपीजीला पर्यायी इंधन शोधलं
Sangli News : IPS झालेल्या आटपाडीच्या सुपुत्राची हत्तीवरून वाजतगाजत मिरवणूक, पडळकरांनी वाटली साखर
Religion Convergence : बेकायदा धर्मांतराला चाप, विधानसभेत धर्मस्वातंत्र्य सादर Special Report
Akola School : अकोल्यातल्या शाळेत थर्मिक फ्लुईड हिटर सिस्टीम Special Report
Tree Cutting For Car Race : रेसचं फॅड, झाडांवर कुऱ्हाड, स्थानिकांचा विरोध Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण, चक्क पोलीस ठाण्यातच हाणामारी; पोलीस अधीक्षक घटनास्थळी
Rohit Sharma : भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
भारतीय क्रिकेट संघाच्या यशाचं मुख्य कारण काय? मुंबईतील कार्यक्रमात रोहित शर्माचं एका शब्दात उत्तर...
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
Video: गल्ली ते दिल्ली... ज्योती वाघमारेंनी माझा कट्टावर उलगडला संघर्ष; खासदारकी जाहीर, एकनाथ शिंदेंसमोरच डोळ्यात पाणी
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
संतापजनक... घरात झोपलेल्या विवाहितेला उचलून नेत अत्याचार, खांबालाही बांधलं; नराधमाला बेड्या
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 14 मार्च 2026 | शनिवार
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
वातावरण फिरलंय... उन्हामुळे कुठं घामाच्या धारा, पण कोल्हापुरात वादळी वारा, पाऊस अन् गारवा
Pakistan : पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, विचित्र पद्धतीनं धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
पाकिस्तानच्या सलमान आगावर आयसीसीची कारवाई, धावबाद झाल्यानंतर हेल्मेट फेकणं महागात पडलं....
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
कागलमध्ये ₹357.99 कोटींचा सर्व्हिस रोडसह 6 पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर मंजूर; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा; सीएम फडणवीस म्हणाले, कोल्हापूरच्या विकासाला नवे पंख
Embed widget