TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 डिसेंबर 2024 : ABP Majha
TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 13 डिसेंबर 2024 : ABP Majha
मुंबईत शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांची पार पडली बैठक, आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन.
मी प्रत्येक वॉर्डमध्ये फिरणार, केलेली कामे बघणार, आतापासून कामाला लागा, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांना सूचना, मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकेल, एकनाथ शिंदेंकडून विश्वास व्यक्त
ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेणार, खासदार मोदींच्या भेटीसाठी गेले असता त्यांना सोमवारची वेळ देण्यात आली.
शिवसेनेची मंत्रिपद एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीची अजित पवार ठरवणार, मित्रपक्षांचे मंत्री ठरवण्यात भाजपची भूमिका नाही, सूत्रांची माहिती.
अजित पवारांना अर्थखातं मिळणार नसेल तर सरकारलाही अर्थ नाही, राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींचं अर्थमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य, अजितदादांशिवाय अर्थमंत्रिपदासाठी दुसरा कोणीच योग्य नाही, मिटकरींचं वक्तव्य.
'एक देश एक निवडणूक' विधेयकाला कॅबिनेटची मंजुरी, हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडलं जाणार, रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाची यापूर्वीच मंजुरी.