एक्स्प्लोर
Advertisement
नाशिक शिवसेनेला धक्का; 350 पदाधिकाऱ्यांसह 36 नगरसेवकांचा राजीनामा
शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदे यांच्या पाठीशी बळ उभे करण्यासाठी राजीनामा देण्यात आला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ भाजपला सोडल्याने नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी नाराज झाले होते. या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला आहे.
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला जोरदार धक्का बसला असून नाशिकमधील शिवसेनेच्या 350 पदाधिकाऱ्यांसह 36नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघात फूट पडली असून शिवसेनेचे बंडखोर विलास शिंदेंच्या पाठीशी बळ उभे करण्यासाठी राजीनामा देण्यात आला आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघ भाजपला सोडल्याने नगरसेवकांसह सर्व पदाधिकारी नाराज झाले होते. या नाराजीतून त्यांनी राजीनामा दिला आहे.
नाशिक पश्चिममध्ये भाजपाच्या सीमा हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे या मतदारसंघातून विलास शिंदे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. नाशिक पश्चिम मतदारसंघात शिवसेनेची ताकद असल्याने युतीच्या जागावाटपात ही जागा शिवसेनेला सोडण्याची जोरदार मागणी होत होती. शिवसेनचे जवळपास २२ नगरसेवक या मतदारसंघात आहेत. त्यामुळे शिवसेनेने या मतदारसंघावर दावा होता. परंतु, तेथे सीमा हिरे या विद्यमान आमदार असल्याने भाजपने दावा सोडला नाही. जागावाटपात हा मतदारसंघ भाजपकडे गेल्यानंतर शिवसेनेचे इच्छुक, कार्यकर्ते आणि नगरसेवकांचा हिरमोड झाला. त्यामुळे या नाराजीतून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह नगरसेवकांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली.
संतोष गायकवाड, दत्तात्रय सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, प्रविण तिदमे, दीपक दातीर, सुदाम डेमसे, भागवत आरोटे, हर्षा बडगुजर, कल्पना पांडे, हर्षदा गायकर, किरण गामने, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, नयन गांगुर्डे, राधा बेंडकुळे, रत्नमाला राणे, सीमा निगळ आदी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे.
शिवसेनेचा बालेकिल्ला असतानाही भाजपने आपला उमेदवारी देऊन या मतदारसंघात घुसखोरी केल्याचा आरोप या नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे आपण विलास शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे. विलास शिंदे यांना विजयी करू असा निर्धार शिवसेनेच्या नगरसेवकांनी केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement