(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Buldana Election: बुलढाण्यात भाजपला धक्का; संग्रामपूर बच्चू कडूंच्या तर मोताळा काँग्रेसच्या हाती
Buldana Election 2022: संग्रामपूर नगर पंचायतमध्ये निर्विवाद राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीने विजय मिळवला असून मोताळा नगर पंचायतीत काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे.
Buldana Election 2022: बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा (Motala Nagar Panchayat Election) आणि संग्रामपूर नगर पंचायत निवडणुकीच्या (Sangrampur Nagar Panchayat Election) प्रत्येकी 17-17 जागांचे निकाल लागले आहेत. संग्रामपूर नगर पंचायतमध्ये निर्विवाद राज्य मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीने विजय मिळवला असून मोताळा नगर पंचायतीत काँग्रेसने आपली सत्ता कायम राखली आहे.
खरं तर जिल्ह्यातील संग्रामपूर नगर पंचायतीची निवडणूक ही प्रस्थापित विरुद्ध नवख्या व जिल्ह्यात पहिल्यांदाच प्रवेश केलेली प्रहार पक्षाशी होती. त्यामुळे प्रस्थापित असलेले व माजी मंत्री डॉ. संजय कुटे यांच्या जळगाव जामोद मतदार संघातील संग्रामपूर नगर पंचायत आहे व त्यांनी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची केली होती. महाविकास आघाडी तर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणेंच्या प्रयत्नांना थोडं फार यश आलं आहे. महाविकास आघाडीच्या काँग्रेस पक्षाला 05 जागा मिळाल्या आहे. त्यामुळे जर मोठं नुकसान झालं असेल तर डॉ.संजय कुटे यांच त्यांचे कार्यकर्त्यांशी दुरावत चाललेलं संबंध, मतदार संघातील मोजकाच जनसंपर्क ही कारणीभूत आहे.
मोताळा नगर पंचायतीत काँग्रेस ने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे याचं सर्व श्रेय जात ते बुलढान्याचे काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांना कारण पूर्ण वेळ सपकाळ यांनी मोताळा येथील निवडणुकीला दिला तर शिवसेनेचे विध्यमान आमदार संजय गायकवाड यांनी ही येथील निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
हे देखील वाचा-
- वैभववाडीत भाजपचे वर्चस्व तर कुडाळमध्ये सेनेला 7 जागा, कुडाळमध्ये सेना भाजप आमने-सामने
- NagarPanchayat Elections Result : बच्चूभाऊंचा 'प्रहार'! संग्रामपूर नगरपंचायत एकहाती जिंकली, दिग्गजांना धक्का
- Nagar Panchayat Elections 2022 Result Live : नगरपंचायत, झेडपीचा रणसंग्राम; निकालात कुणाची सरशी, पाहा प्रत्येक अपडेट
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha