एक्स्प्लोर

वैभववाडीत भाजपचे वर्चस्व तर कुडाळमध्ये सेनेला 7 जागा, कुडाळमध्ये सेना भाजप आमने-सामने

कोकणातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीचे निकाल देखील हाती आले आहेत. यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे, तर कुडाळ नगपंचायतीत मात्र भाजपला अपेक्षीत यश मिळाले नाही.

Nagar Panchayat Elections 2022 Result : राज्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये अत्यंत्य प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या कोकणातील वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीचे निकाल देखील हाती आले आहेत. या निवडणुकीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या दोन नगपंचायतीत भाजप विरुद्ध शिवसेना असाच थेट सामना रंगल्याचे पाहायला मिळाले होते. यामध्ये वैभववाडी नगरपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे, तर कुडाळ नगपंचायतीत मात्र भाजपला अपेक्षीत यश मिळवता आले नाही.   

सिंदुदुर्ग जिल्ह्यातील  वैभववाडी आणि कुडाळ नगरपंचायतीची निवडणूक ही केंद्रीय  मंत्री नारायण राणे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक मानली जात होती. या निवडणुकीत त्यांनी विशेष लक्ष घातले होते. त्याप्रमाणे वैभववाडी नगरपंचायतीवर नारायण राणेंच्या गटाने वर्चस्व राखले आहे. वैभववाडी नगरपंचायतीत 17 जागांपैकी भाजपला 10 जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेनेला 5 जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांच्या वाट्याला दोन जागा मिळाल्या आहेत. वैभववाडी नगरपंचायतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खाते खोलता आले नाही.  

दुसरीकडे नारायण राणे विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेल्या कुडाळ नगपंचायतीत 17 जागांपैकी भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत. शिवसेना 7 जागा तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत. जरी सर्वांत जास्त जागा भाजपला मिळाल्या असल्या तरी राणेंना तिथे एकहाती सत्ता मिळवा आली नाही. या नगरपंचायतीवर कोणाची सत्ता येणार हे सध्या सांगता येत नाही. कारण काँग्रेसच्या पाठिंबा कोणाला मिळणार यावर सत्तेची गणित अवलंबून राहणार आहेत. मात्र, राणेंना कुडाळमध्ये अपेक्षीत यश मिळाले नसल्याचे दिसत आहे. 

दरम्यान, कुडाळात विजयानंतर शिवसेनेने आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वात शहरातून रॅली काढली. या रॅलीला भाजपने विरोध केल्याचे पाहायला मिळाले. भाजप कार्यालयाबाहेर अभूतपूर्व गोंधळ झाल्याचे पाहायला मिलाले. राणे समर्थक आणि  शिवसेनेचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचे पाहायला मिळाले. मात्र पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना अडवलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी वैभव नाईक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी दिल्याचे पाहायला मिळाले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 PM : 23 May 2024TOP 50 : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM : टॉप 50 न्यूज : 23 May 2024 : ABP MajhaTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 06 PM : 23 May 2024: ABP MajhaABP Majha Headlines : 06 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
नाशिकपाठोपाठ नगरमध्ये ठेवींचा अपहार उघड, तब्बल पाच कोटींची फसवणूक, ठेवीदारांचे धाबे दणाणले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
माजोरड्या मुलाचा संतापजनक रॅप, कुठलाही पश्चाताप नाही; व्हिडिओ व्हायरल होताच नेटीझन्स भडकले
Nashik News : बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन चुलत भावंडांचा बुडून मृत्यू, एकाच आठवड्यातील तिसऱ्या घटनेनं नाशिक हादरलं
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
बुमराहकडे बर्फाच्या खेळपट्टीवरही भेदक मारा करण्याची क्षमता, ब्रेट लीकडून कौतुकाची थाप
Laapataa Ladies Animal Movie : किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
किरण रावच्या 'लापता लेडिज'ने संदीप वांगा रेड्डीच्या 'अॅनिमल'ला पछाडले
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
आख्ख्यं गाव उपाशी, दोन दिवसापासून चूल पेटली नाही, उजनी बोट दुर्घटनेनंतर झरे गाव स्तब्ध
Embed widget