एक्स्प्लोर

Nagar Panchayat Elections 2022 Result Live : गडचिरोलीतील नगरपंचायतींचा आज निकाल, पाहा प्रत्येक अपडेट

Maharashtra Nagarpanchayat Election LIVE Updates : आज गडचिरोलीतील नगरपंचायतींचा निकाल येत आहे. पाहा कुणी बाजी मारली?

LIVE

Key Events
Nagar Panchayat Elections 2022 Result Live : गडचिरोलीतील नगरपंचायतींचा आज निकाल, पाहा प्रत्येक अपडेट

Background

Maharashtra Nagarpanchayat Election : सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षण स्थगित केल्यानंतर राज्यातील नगरपंचयातीच्या खुल्या झालेल्या जागांवर  मतदान होत आहे. याशिवाय भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदांच्या 23 आणि त्याअंतर्गत पंचायत समित्यांच्या 45 जागांसाठीही काल मतदान पार पडलं. 105 नगरपंचायतींपैकी 93 नगरपंचायतीच्या 336 जागांसाठी काल सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदान सुरु झालं होतं. याशिवाय 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्त जागांसाठीही मतदान काल मतदान झालं. आज (बुधवार) निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तसेच, सर्व ठिकाणी बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार विविध महानगरपालिकांतील 4 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी देखील 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या 15 डिसेंबर 2021 च्या आदेशानुसार या कार्यक्रमात अंशत: बदल करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा तात्काळ अनारक्षित करून सर्वसाधारण प्रवार्गातून भरण्यासाठी नव्यानं निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार काल मतदान पार पडलं. अन्य सर्व जागांसाठी मात्र पूर्वनियोजितपणे 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडलं.

राज्य निवडणूक आयोगाने एकूण 106 नगरपंचातींच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यातील तलासरी, विक्रमगड, मोखाडा, पेठ, सुरगाणा, धडगाव- वडफळ्या- रोषणमाळ, झरी- जामणी, मुलचेरा, एटापल्ली, कोरची, भामरागड या 11 नगरपंचायतींमध्ये एकही जागा नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी राखीव नव्हती. त्यामुळे तेथे सर्व जागांसाठी 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान पार पडलं. उरलेल्या 95 नगरपंचायतीतील अनारक्षित झालेल्या 344 जागांसाठी 18 जानेवारी 2022 रोजी मतदान होणार होतं. त्यापैकी शिर्डीतील 4 आणि आणि कळवणमधील 2 जागा बिनविरोध झाल्यानं तिथं मतदानाची आवश्यकता राहिली नाही. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. त्यामुळे आता 93 नगरपंचायतीतील 336 जागांसाठी काल मतदान झालं. 

भंडारा जिल्हा परिषदेच्या 13 आणि गोंदिया जिल्हा परिषदेच्या 10, तसेच या दोन्ही जिल्ह्यातील पंचायत समित्यांतील 45 जागांसाठीदेखील काल प्राथमिक अंदाजानुसार सरासरी 73 टक्के मतदान झालं. त्याचबरोबर विविध जिल्ह्यांतील 195 ग्रामपंचायतींमधील 209 रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी प्राथमिक अंदाजानुसार, सरासरी 76 टक्के मतदान झालं. सांगली- मिरज- कुपवाड महानगरपालिकेच्या एका रिक्तपदाच्या पोटनिवडणुकीसाठीसुद्धा प्राथमिक अंदाजानुसार, 50 टक्के मतदान झालं. या सर्व ठिकाणी बुधवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. 

13:09 PM (IST)  •  20 Jan 2022

अहेरी नगर पंचायतीत भाजपला सहा जागा तर आविसला पाच जागा

अहेरी नगर पंचायत - 
एकूण जागा - 17

भाजप - 06

शिवसेना -02

राष्ट्रवादी - 03 

काँग्रेस - 00

अपक्ष - 01

आविस - 5

13:08 PM (IST)  •  20 Jan 2022

एटापल्ली नगरपंचायतीत काँग्रेसला पाच तर भाजप, राष्ट्रवादीला तीन तीन जागा

एटापल्ली नगरपंचायत-एकूण 17 जागा
भाजप- 3
काँग्रेस- 5
राष्ट्रवादी काँग्रेस- 3
शिवसेना-
आवीस- 2
अपक्ष- 4

12:34 PM (IST)  •  20 Jan 2022

सिरोंचा नगरपंचायतीत अपक्षांचा बोलबाला, 10 अपक्ष विजयी तर राष्ट्रवादीला पाच जागा

सिरोंचा नगरपंचायत-एकूण 17 जागा
भाजप- 0
काँग्रेस- 0
राष्ट्रवादी काँग्रेस-5
शिवसेना- 2 
अपक्ष- 10

12:33 PM (IST)  •  20 Jan 2022

मुलचेरा नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती, राष्ट्रवादीला सहा तर शिवसेनेला चार जागा, सहा अपक्ष विजयी

मुलचेरा नगरपंचायत-एकूण 17 जागा
भाजप- 1
काँग्रेस- 0
राष्ट्रवादी काँग्रेस- 6
शिवसेना- 4 
अपक्ष- 6

12:32 PM (IST)  •  20 Jan 2022

धानोरा नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती सत्ता, 13 जागा जिंकत सत्ता काबिज

धानोरा नगरपंचायत एकूण 17 जागा
काँग्रेस- 13
भाजप -3
अपक्ष- 1

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget