Shrikant Pangarkar Joins Shivsena: गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा एकनाथ शिंदेंच्या गटात प्रवेश; ‘या’ पदावर नियुक्ती, विरोधकांनी व्यक्त केला संताप
Gauri Lankesh Murder Accused Shrikant Pangarkar Joins Shivsena: श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. यावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
जालना: पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपीने शिवसेना (एकनाथ शिंदे) प्रवेश केला आहे. श्रीकांत पांगारकर असं त्यांचं नाव आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक असलेल्या श्रीकांत पांगारकर यांचा शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला आहे. महत्त्वाचे म्हणजे पक्षप्रवेशानंतर श्रीकांत पांगारकर याची लगेच जालना विधानसभा प्रमुखपदी नियुक्तीही करण्यात आली आहे. श्रीकांत पांगारकरच्या पक्षप्रवेशानंतर राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांनाही उधाण आलं आहे. यावरून अनेक प्रतिक्रिया समोर येत आहेत.
श्रीकांत पांगारकर हे शिवसेनेचे उबाठा पक्षाचे माजी नगरसेवक असून 4 स्पटेंबर रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे,
पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणात सहभाग असल्याच्या संशयावरून ऑगस्ट 2018 रोजी त्यांना अटक करण्यात आल होतं, त्याला मागील महिन्यात कर्नाटक कोर्टाने जमीन मंजूर केला आहे, काल (शनिवारी) शिवसेना उपनेते अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील यंत्रणांच्या मदतीने केलेल्या तपासात अनेकांना अटक करण्यात आली. पांगारकर शिवसेनेत होते. 2001 ते 2006 दरम्यान ते जालना महापालिकेचे नगरसेवक होते. त्यांना 2018 मध्ये अटक करण्यात आली होती. मात्र, कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना 4 सप्टेंबर रोजी जामीन मंजूर केला होता.
श्रीकांत पांगारकर यांचा शिवसेनेत प्रवेश
पीटीआयच्या वृत्तानुसार, शिवसेनेने त्यांना 2011 मध्ये तिकीट दिले नव्हते त्यामुळे ते हिंदू जनजागृती समितीत सामील झाले होते. आता त्यांनी शुक्रवारी पक्षाचे नेते आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.
श्रीकांत पांगारकर यांना कोणती जबाबदारी मिळाली?
प्रसारमाध्यमांशी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, “त्यांची जालना विधानसभा निवडणुकीच्या प्रचारप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. जालन्यातून विधानसभा निवडणूक लढवायची आहे, पण महायुतीमध्ये (शिवसेना, भाजप आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी आघाडी) जागावाटपाची चर्चा सुरू असल्याचेही खोतकर म्हणाले. ही जागा काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्याकडे आहे.
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी?
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केले आहेत. राज्यातील विधानसभेच्या सर्व 288 जागांवर एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून, निकाल 23 नोव्हेंबरला जाहीर होणार आहेत. सध्याच्या विधानसभेचा कार्यकाळ 26नोव्हेंबरला संपत आहे.
कोण आहे श्रीकांत पांगारकर?
जालन्यातील श्रीकांत पांगारकर शिवसेनेचा माजी नगरसेवक असले, तरी त्यांचे वडील जगन्नाथ पांगारकर हे भाजपाचे माजी नगरसेवक होते. भाजपाचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख होती. जवळपास 20 ते 25 वर्षांपूर्वी जालन्यामध्ये शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली होती. त्यावेळी जगन्नाथ पांगारकर यांचा मुलगा श्रीकांत पांगारकर .यांनी शिवसेनेत प्रवेश केला. पांगारकरांचा जालन्यात स्वस्त दरात धान्य व रॉकेलचा व्यवसाय होता.
2001 ते 2010 अशी ते शिवसेनेचे नगरसेवक होता. 2011ला त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर श्रीकांत पांगारकर हिंदू जनजागृती समितीचा पदाधिकारी म्हणून काम करु लागले.
खासदार सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
खासदार सुप्रिया सुळेंनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. 'धक्कादायक! गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचे सरकारने स्वागत केले. कायद्याचे राज्य पायदळी तुडवून गुन्हेगारांना संरक्षण देणारे या सरकारला न्यायाबद्दल शून्य आदर आहे', अशी पोस्ट त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट केली आहे.
Shocking! An accused in the Gauri Lankesh murder case welcomed with open arms by the 3rple 🚂📦Sarkar. This government has zero respect for justice—protecting criminals while trampling on the rule of law. Maharashtra deserves better than this #khokesarkar, compromised leadership!…
— Supriya Sule (@supriya_sule) October 20, 2024
अंबादास दानवेंची प्रतिक्रिया
नरेंद्र दाभोलकर हत्या त्या शक्तीने केली होती. त्यातील आरोपी शिंदे गटात आहे. हत्या करणारे आरोपी मुख्यमंत्र्याच्या गटात सहभागी होत असेल तर लक्षात येते अशा लोकांबद्दल मुख्यमंत्र्यांना प्रेम आहे. त्याच हे उदाहरण आहे. जनतेने लक्ष द्यावं. हत्या झाली त्यावेळी अशा शक्ती त्यांच्या मागे यांच्या हात तर नव्हता ना? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.