एक्स्प्लोर

Rajasthan Exit Poll : वसुंधरा राजेंना धक्का, भाजपचे तीनतेरा

Assembly Election Exit Polls 2018 : एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस 101, तर भाजप 83 जागा मिळवण्याचा अंदाज आहे.

मुंबई : लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालाकडे  अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. 11 डिसेंबरला सर्वच विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येणार आहेत. मात्र त्याआधी एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलमध्ये मतदार राजाचा कौल पाहायला मिळत आहे. एक्झिट पोलनुसार राजस्थान दर पाच वर्षांनी सत्तापालट करण्याची पद्धत यंदाही कायम ठेवण्याची चिन्हं आहेत. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये कांटे की टक्कर असली, तरी काँग्रेस सत्ता काबीज करण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना मोठा धक्का बसू शकतो. वसुंधरा राजे थकल्या असून खूप जाड झाल्या आहेत : शरद यादव राजस्थान विधानसभेत 200 जागा असून बहुमताचा आकडा 101 आहे. मात्र 199 जागांवर निवडणुका पार पडल्या. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार राजस्थानमध्ये काँग्रेस 101 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. भाजपच्या पारड्यात 83 जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 15 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक 2013 आणि एक्झिट पोलची तुलना 2013 मधील निवडणुकीत 163 जागांवर विजय मिळवून भाजपने शानदार पुनरागमन केलं होतं. काँग्रेसला अवघ्या 21 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. मात्र एक्झिट पोलनुसार येत्या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडू शकते. भाजपला तीन अंकी जागाही मिळवता येणार नसल्याचं एक्झिट पोलची आकडेवारी सांगते. भाजपच्या जागा जवळपास निम्म्यावर जाण्याची चिन्हं आहेत. तर काँग्रेसच्या जागा पाचपट होण्याचे संकेत आहेत. संबंधित बातम्या: Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज Madhya Pradesh Exit Poll: भाजपची हार, काँग्रेस सत्ता मिळवण्याचा अंदाज Chhattisgarh Exit Poll: रमण सिंह चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदी बसण्याची चिन्हं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra Election

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Nashik Election : प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
प्रचाराची स्लिप वाटण्यावरून ठाकरे गट-भाजपमध्ये राडा, बाचाबाचीनंतर थेट तुफान हाणामारी
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Embed widget