एक्स्प्लोर

Loksabha Election 2019 LIVE BLOG | राज्यातील दहा मतसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी

Loksabha Election 2019 second phase voting in 10 constituencies in Maharashtra  Loksabha Election 2019 LIVE BLOG | राज्यातील दहा मतसंघातील मतदानाची अंतिम टक्केवारी

Background

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान आज पार पडणार आहे. राज्यातील 10 मतदारसंघांसह देशभरातील 97 जागांसाठी मतदान होणार आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, अमरावती, मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापुरात आज मतदान होईल. सुशीलकुमार शिंदे, प्रकाश आंबेडकर, अशोक चव्हाण, प्रीतम मुंडे, आनंदराव अडसूळ यासारख्या दिग्गजांचं भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत. त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक उमेदवार बीड मतदारसंघात (36) असून सर्वात कमी उमेदवार लातूर मतदारसंघात (10) आहेत. याव्यतिरिक्त बुलडाणा मतदारसंघात 12, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

आसाम, बिहार, छत्तीसगढ, जम्मू काश्मिर, कर्नाटक, महाराष्ट्र, मणिपूर, ओदिशा, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पुदुच्चेरी अशा 13 राज्यांमधील 97 जागांवर आज मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे

दुसऱ्या टप्प्यातील प्रमुख लढती

अकोल्यात तिरंगी सामना

अकोल्यात भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रेंना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर काँग्रेसने हिदायत पटेल यांना दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. 2014 मधील निवडणुकीत धोत्रेंनी हिदायत पटेल यांना पराभवाची धूळ चारली होती, त्यामुळे पराभवाचा वचपा काढण्यासाठी पटेल उत्सुक असतील. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर अकोला आणि सोलापूर अशा दोन जागांवरुन निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे यंदाही अकोल्यातील लढत तिरंगी होणार आहे. अकोल्यात गेल्या वेळी प्रकाश आंबेडकर तिसऱ्या स्थानी होते.

सोलापुरातही तिहेरी लढत

भाजपने विद्यमान खासदार शरद बनसोडेंचा पत्ता कट करत डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी दिली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे नाही-नाही म्हणताना काँग्रेसकडून पुन्हा रिंगणात उतरले आहेत. गेल्या निवडणुकीत भाजपकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची शिंदेंना संधी आहे. मात्र आंबेडकरांचं आव्हान तगडं ठरल्यास सोलापुरातही तिहेरी लढत होणार.

अमरावतीत पुन्हा अडसूळ विरुद्ध नवनीत राणा

शिवसेनेचे विद्यमान खासदार आनंदराव अडसूळ पुन्हा निवडणुकांच्या मैदानात उतरले आहेत. नवनीत राणा आपल्या 'युवा स्वाभिमान पार्टी'कडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, मात्र त्यांना महाआघाडीचा पाठिंबा आहे. त्यामुळे 2014 मधील हायव्होल्टेज ड्रामाची पुनरावृत्ती होणार, हे निश्चित.

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील 10 जागांवर 2014 सालची आकडेवारी कशी होती?


नांदेडमधून काँग्रेसचा महाराष्ट्रातला एकमेव खासदार

गेल्या वेळी महाराष्ट्रात काँग्रेसचे अवघे दोन खासदार निवडून आले होते. दोघंही जण यंदा पुन्हा निवडणुकांच्या रिंगणात उतरण्यास अनुत्सुक होते. अखेर त्यापैकी एक असलेले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण पुन्हा निवडणूक लढवण्यास तयार झाले आहेत. तेही ना'राजी'नाम्याचं नाट्य झाल्यानंतर. खरं तर नांदेड हा अशोक चव्हाणांचा पारंपरिक मतदारसंघ. मात्र शिवसेनेतून भाजपमध्ये आलेल्या प्रताप पाटील चिखलीकराची टक्कर त्यांना असेल. त्यामुळे काँग्रेसच्या एकमेव खासदाराला आपली जागा टिकवण्याचं आव्हान आहे.

विद्यमान खासदाराला 'बाद' करणारा उस्मानाबाद

उस्मानाबादेतून शिवसेनेने विद्यमान खासदार रवींद्र गायकवाडांना बाद करत ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिलं आहे. राष्ट्रवादीकडून माजी खासदार पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. एकमेकांचे हडवैरी मानल्या जाणाऱ्या दोन भावांमध्ये टक्कर पाहायला मिळणार आहे. ओमराजे निंबाळकर यांनी 2009 सालच्या विधानसभा निवडणुकीत राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर 2014 साली राणा पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांचा दारुण पराभव केला होता.

बीडचा सोपा गड

बीडचा गड भाजपसाठी तुलनेने सोपा मानला जातो. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर 2014 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या डॉ. प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादीने बजरंग सोनावणे यांना त्यांच्याविरोधात उमेदवारी दिली आहे.

बुलडाण्यातून शिवसेनेचे विद्यमान खासदार प्रतापराव जाधव रिंगणात आहेत, तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे राजेंद्र शिंगणे रिंगणात आहेत.

मराठवाड्यात चित्र काय?

परभणीतूनही शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय जाधव यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं आहे. तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीचे राजेश विटेकर मैदानात उतरले आहेत. लातूरमध्ये भाजपने विद्यमान खासदार सुनील गायकवाड यांचा पत्ता कट करत सुधाकरराव शिंगारे यांना उमेदवारी देण्यात आली. तर काँग्रेसने मच्छिंद्र कामंत यांना उतरवलं आहे. हिंगोलीतील काँग्रेसचे खासदार राजीव लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक नसल्यामुळे पक्षाने सुभाष वानखेडेंना उमेदवारी दिली. तर हेमंत पाटील यांना शिवसेनेने तिकीट दिलं आहे.

पहिल्या टप्प्यात नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या विदर्भातील सात मतदारसंघांसह देशभरात 91 ठिकाणी मतदान पार पडलं होतं.

दुसरा टप्प्यात कोणत्या राज्यात किती मतदारसंघ (97)

आसाम - 5
बिहार - 5
छत्तीसगड - 3
जम्मू काश्मिर - 2
कर्नाटक - 14
महाराष्ट्र - 10
मणिपूर - 1
ओदिशा - 5
तामिळनाडू - 39 (सर्व)
त्रिपुरा - 1
उत्तर प्रदेश - 8
पश्चिम बंगाल - 3
पुदुच्चेरी - 1

संबंधित बातम्या :

 

दुसऱ्या टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या, राज्यातील 10 मतदारसंघात गुरुवारी (18 एप्रिल) मतदान

 

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज

 

Loksabha Election 2019 : चौथ्या टप्प्यामधील लढतींचे चित्र स्पष्ट, अनेक ठिकाणी चुरस

 

दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस, कोणकोणत्या प्रमुख लढती?

 

विदर्भातील रंगतदार लढती, पहिल्या टप्प्यातील सात मतदारसंघांचा आढावा

 

शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीच्या 'या' उमेदवारांना भिडणार

 

गडकरी वि. पटोले, पूनम महाजन वि. प्रिया दत्त, महाराष्ट्रातील बिग फाईट्स

 

लोकसभा निवडणूक 2019 | महाराष्ट्रात चार टप्प्यात मतदान, मतमोजणी 23 मे रोजी
00:04 AM (IST)  •  19 Apr 2019

राज्यातील दहा मतसंघात एकूण 62.43 टक्के मतदान बुलडाणा - 62 टक्के, अकोला - 61.76 टक्के, अमरावती - 63.08 टक्के, हिंगोली - 63.38 टक्के, नांदेड - 62.97 टक्के, परभणी - 62.74 टक्के, बीड - 64.37 टक्के, उस्मानाबाद - 62.75 टक्के, लातूर - 62.02 टक्के, सोलापूर - 59.57 टक्के
18:04 PM (IST)  •  18 Apr 2019

राज्यात 10 जागांवर दुपारी पाच वाजेपर्यंत 57.22 टक्के मतदान झालं आहे. बुलडाणा - 57 .8 टक्के, अकोला - 54.45 टक्के, अमरावती 55.43 टक्के, हिंगोली - 60.69 टक्के, नांदेड - 60.88 टक्के, परभणी - 58.50 टक्के, बीड - 58.44 टक्के, उस्मानाबाद - 57.04 टक्के, लातूर 57.94 टक्के, सोलापूर - 51.98 टक्के = एकूण - 57.22 टक्के
Load More
New Update
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shivsena vs BJP : भाजप-शिवसेनेची राज्यात मैत्री, पण नगरपालिकेत कुस्ती? Special Report
Donkey soap : गाढविणीच्या दुधाने अंघोळ, काय असतं खास? Special Report
Periods Leave Policy : कोणत्या राज्यात मिळते मासिळ पाळी रजा? Special Reports
Iran : इराणमध्ये फाशीचं सत्र, दहा महिन्यात 1000 जण फासावर Special Report
Celebrity Marriage : अब्जाधीश वामसी गदिराजूंचा डोळे दीपवणारा लग्नसोहळा Special Report
ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
आशिया कप रायझिंग स्टारच्या फायनलमध्ये सुपर ओव्हर, बांगलादेशला पराभूत करत पाकिस्तानचा विजय
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
IND vs SA : वनडे मालिकेसाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ जाहीर, मालिकेचं वेळापत्रक जाणून घ्या
Iran : एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
एका वर्षात एक हजारांहून अधिक जणांना फाशी, विरोधात गेला तर शेवट जल्लादाच्या हाती ठरलेला
Share Market : भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी 'या' स्टॉक्सवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता
शेअर बाजारातील 'या' स्टॉकवर लक्ष ठेवा, मोठ्या घडामोडींची शक्यता, कमाईची संधी
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
मुंबई-नाशिक महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी 
Sunil Shelke : मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
मावळचा आमदार आमचा नसला तरी त्याचा बाप मुख्यमंत्री आमचा; चित्रा वाघ यांच्या समोर महिला नेत्याचं बेताल वक्तव्य
Yugendra Pawar : आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
आमच्या चार उमेदवारांना प्रत्येकी 20 लाख देऊन फोडलं; युगेंद्र पवारांचा बारामतीत आरोप
IPL :राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठा निर्णय घेणार
राजस्थान रॉयल्स जयपूरला बाय बाय करणार? आयपीएलचे सामने पुण्यात होणार? RR मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Embed widget