एक्स्प्लोर
Advertisement
दहावी, बारावी नापास विद्यार्थ्यांसाठी फेरपरीक्षा ऑक्टोबरमध्ये : शिक्षणमंत्री
दहावीमध्ये जवळपास एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत.या विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्वाची माहिती दिलीय.
हिंगोली : यावर्षी दहावी आणि बारावीमध्ये नापास झालेल्या आणि एटीकेटी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑक्टोबर महिन्यामध्ये घेतल्या जातील अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. हिंगोलीत एबीपी माझाशी बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. गायकवाड या सध्या हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत.
यावेळी दहावी आणि बारावीच्या नापासांच्या परीक्षांबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, दहावीमध्ये जवळपास एक लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये एक लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. सोबतच काही विद्यार्थी असे आहेत ज्यांना एटीकेटी देखील प्राप्त झाले आहेत. दहावीतील एटीकेटी विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची परवानगी आहे. मात्र नापास आणि एटीकेटी विद्यार्थ्यांना एक संधी म्हणून आपण ऑक्टोबर महिन्यात फेरपरीक्षा घेण्याचा विचार करत आहोत, असं त्या म्हणाल्या.
आज त्या विविध बाबींचा आढाव घेणार असून उद्या ध्वजारोहण सकाळी करून वाशिमकडे रवाना होणार आहे. हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज त्यांची बैठक पार पडली.
राज्याचा दहावीचा निकाल 95.30 टक्के लागला. राज्यात 96.91 टक्के मुली पास झाल्या. तर 93.90 टक्के मुलांनी बाजी मारली. यंदा 3.1 टक्क्यांनी मुलींचा निकाल जास्त लागला. तर कोकण विभागाने यंदाही बाजी मारली आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.
बारावी परीक्षेला राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य आणि एचएसची व्होकेशनल या शाखांमधील एकूण 14, 20, 575 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14, 13, 687 विद्यार्थी परीक्षेला पात्र ठरले. त्यापैकी 12, 81, 712 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 90.66 टक्के आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement