UPSC चा निकाल जाहीर, आदित्य श्रीवास्तव देशात पहिला; येथे पाहा निकाल
UPSC CSE Mains Result 2023 : युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षार्थी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासू शकतात.
UPSC Result 2023 : युपीएससी परीक्षेचा निकाल (UPSC CSE Mains Result 2023) अखेर जाहीर झाला आहे. परीक्षार्थींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सीएसई मेन्स परीक्षा 2023 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. युपीएससीचा निकाल जाहीर झाला असून परीक्षार्थी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासू शकतात.आदित्य श्रीवास्तव देशात पहिला आला आहे. युपीएससी परीक्षेमध्ये टॉप रँकमध्ये मुलांचं वर्चस्व दिसून येत आहे. युपीएससी सीएसई मेन्स परीक्षा 2023 मध्ये 1016 परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आलं आहे.
युपीएससी निकालात तरुणांची बाजी
केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) आज नागरी सेवा मुख्य निकाल 2023 जाहीर केला आहे. परीक्षा देणारे इच्छुक अधिकृत वेबसाइटवर गुणवत्ता यादी पाहू शकतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात लखनौच्या (Lucknow) आदित्य श्रीवास्तव (Aditya Srivastava) याने अव्वल क्रमांक (AIR2) पटकावला आहे. यानंतर दुसऱ्या क्रमांकावर(AIR 2) अनिमेश प्रधान (Animesh Pradhan) आहेत, त्यानंतर डोनुरु अनन्या रेड्डी (Donuru Ananya Reddy) तिसऱ्या स्थानावर आहे.
येथे पाहा निकाल (UPSC CSE Mains Result 2023 Check Here)
केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा मुख्य निकालात नियुक्तीसाठी एकूण 1016 उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचा रोल नंबर यूपीएससीने जाहीर केला आहे. युपीएससीचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षार्थी upsc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर निकाल तपासू शकतात.
पीके सिद्धार्थ रामकुमार चौथ्या तर रुहानी पाचव्या स्थानावर आहे.
निकाल तपासण्यासाठी काय करावं लागेल?
सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट - upsc.gov.in वर जा.
तुम्हाला वेबसाइटच्या होमपेजवर निकालाची लिंक दिसेल.
निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
तुमच्या समोर एक PDF उघडेल.
तुमचा रोल नंबर पीडीएफमध्ये (PDF) शोधा.
पीडीएफ (PDF) डाउनलोड करा आणि निकालाची प्रिंटआउट घ्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI