UGC NET Result 2023 Declared: NTA कडून यूजीसी नेट परीक्षेचा निकाल जाहीर; झटपट चेक करण्यासाठी 'ही' लिंक पाहा
UGC NET Result 2023 Declared: UGC NET परीक्षेचा डिसेंबरचा निकाल NTA नं जाहीर केला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, आता उमेदवार अधिकृत वेबसाईटवर तपासू शकतात.
UGC NET Result 2023 Declared: यूजीसी नेट परीक्षेचा (UGC NET Exam) डिसेंबरचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं (National Testing Agency) अखेर जाहीर केला आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी निकालाच्या प्रतिक्षेत होते. अखेर त्यांची प्रतिक्षा संपली असून अधिकृत वेबसाईट https://ugcnet.nta.nic.in/ (Official Website) वर जाऊन ते आपला निकाल पाहु शकतात. परीक्षेत बसलेले उमेदवार त्यांचा अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख टाकून अधिकृत वेबसाईटवर त्यांचा निकाल पाहू शकतात.
NTA नं काही दिवसांपूर्वीच या परीक्षेची फायनल उत्तरपत्रिका जारी केली होती. यावेळी ही परीक्षा 21 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत घेण्यात आली. ही परीक्षा 83 विषयांसाठी 5 टप्प्यांत घेण्यात आली. एकूण 8,34,537 उमेदवार परीक्षेला बसले होते. परीक्षा संपल्यापासून ते निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. यंदा परीक्षेसाठी देशभरात 650 हून अधिक केंद्र स्थापन करण्यात आली होती. यूजीसीचे अध्यक्ष एम. जगदीश कुमार यांनी बुधवारी निकाल जाहीर करण्यासंदर्भात ट्वीट केलं होतं.
UGC NET निकालाचं कोणतंही पुनर्मूल्यांकन/पुर्नतपासणी केली जाणार नाही. या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही. UGC NET डिसेंबर 2022 चे रेकॉर्ड निकाल जाहीर झाल्यापासून 90 दिवसांसाठी जतन केले जातील. अधिक तपशीलांसाठी उमेदवार अधिकृत वेबसाईट पाहू शकतात.
UGC NET डिसेंबर 2022 परीक्षा देशभरात स्थापन केलेल्या केंद्रांवर आयोजित करण्यात आली होती. यंदा परीक्षेसाठी 650 हून अधिक केंद्र स्थापन करण्यात आली होती. ही परीक्षा 32 शिफ्टमध्ये 16 दिवसांत 83 विषयांसाठी 5 टप्प्यांत घेण्यात आली. UGC NET परीक्षेत 8.34 लाखांहून अधिक उमेदवार बसले होते. 21 फेब्रुवारी ते 16 मार्च या कालावधीत ही परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर परीक्षेची प्रोविजनल उत्तरपत्रिका जाहीर करण्यात आली. प्रोविजनल उत्तरपत्रिकेवर आक्षेप घेण्यासाठी उमेदवारांना 25 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. पुनरावलोकनानंतर, NTA ने तात्पुरती अंतिम उत्तर पत्रिका जारी केली होती. तेव्हापासूनच उमेदवार निकालाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. अखेर त्यांची प्रतीक्षा संपली असून निकाल जाहीर करण्यात आला आहे.
कसा पाहाल निकाल?
स्टेप 1: सर्व उमेदवारांनी प्रथम UGC NET च्या अधिकृत वेबसाईट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या.
स्टेप 2 : नंतर मुख्यपृष्ठावर उपलब्ध असलेल्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 3 : यानंतर, तुमचा अर्ज क्रमांक टाकून लॉग इन करा.
स्टेप 4 : तुमच्या स्क्रिनवर तुम्हाला निकाल दिसेल.
स्टेप 5 : तिथे तुम्हाला डाऊनलोडचा पर्याय दिसेल, तुम्ही तुमचा निकाल डाऊनलोड करु शकता.
स्टेप 6 : डाऊनलोड झाल्यानंतर निकालाची प्रिंटही काढता येईल.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI