Online Exam: मुंबई विद्यापीठप्रमाणेच अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्या!
Online Exam: मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ व त्या अंतर्गत येणार्या महाविद्यालयांसाठी आठवडाभरापूर्वी वेळापत्रक जाहीर केलंय.
Online Exam: मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ व त्या अंतर्गत येणार्या महाविद्यालयांसाठी आठवडाभरापूर्वी वेळापत्रक जाहीर केले. त्यामध्ये काही परीक्षा ऑनलाईन तर काही परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे नियोजन करण्यात आले. अंतिम वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल वेळेत जाहीर करता यावा, यासाठी अंतिम वर्षाच्या सर्व परीक्षा या ऑनलाईन पद्धतीने मुंबई विद्यापीठांतर्गत घेण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या.
मुंबईतील स्वायत्त शिक्षण संस्था महाविद्यालयांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा सुद्धा ऑफलाइन पद्धतीने घेणार असल्याचे नियोजन केले आहे. याविरोधात विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण विभागाला महाविद्यालयांना पत्र लिहून या परीक्षा मुंबई विद्यापीठाप्रमाणे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर आता उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुद्धा अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात अशा आशयाचे पत्र स्वायत्त शिक्षण संस्था, महाविद्यालयांना देण्यात आला आहे.
उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या संचालिका यांनी मुंबई विद्यापीठाच्या निर्णयानुसारच अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घ्याव्यात, जेणेकरून ऑनलाईन ऑफलाइन पद्धतीने गुणदान करण्याच्या प्रक्रियेत महाविद्यालय मध्ये भेदभाव होणार नाही असे पत्रात नमूद करून परीक्षेसंदर्भात स्वायत्त शिक्षण संस्था, महाविद्यालयांच्या प्राचार्यांना हे पत्र लिहिले आहे.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाने पाठवलेले पत्र हे स्वायत्त शिक्षण संस्था महाविद्यालयांना बंधनकारक नसल्याचे सुद्धा काही प्राचार्यांनी सांगितला आहे. त्यामुळे या पत्रानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा या ऑनलाइन पद्धतीने घेण्यात याव्यात अशा प्रकारचा आग्रह जरी विभागाकडून करण्यात येत असला तरी त्यावर महाविद्यालयात पुन्हा एकदा बैठक घेऊन परीक्षा संदर्भात विचार केला जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार विभागाने दिलेल्या पत्राचा कितपत विचार स्वायत्त शिक्षण संस्था, महाविद्यालय करतात हे पाहावे लागेल
हे देखील वाचा-
- Exclusive : 'व्हिडीओमध्ये वाक्यांची मोडतोड', फडणवीसांनी गंभीर आरोप केलेल्या वकील प्रवीण चव्हाणांचं स्पष्टीकरण
- संतापजनक! एक वर्षाच्या चिमुकलीला जीवंत पुरलं... निर्दयी बापाचं कृत्य, भांडण लेकराच्या जीवावर..
- Palghar News : हंगामाच्या सुरुवातीलाच आंबा,काजू, जांबु फळांवर अवकाळी आणि गारपिटीच संकट!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI