NEET Admit Card Download Link: नीट परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड रिलिज, इथून करा डाऊनलोड
NTA NEET Admit Card Released : नॅशनल टेस्टिंग एजेंसीकडून घेतली जाणारी NEET 2020 परीक्षेसाठी अॅडमिट कार्ड आज रिलिज करण्यात आली आहेत. ही परीक्षा 13 सप्टेंबर 2020 रोजी देशातील विविध शहरांमधील परीक्षा केंद्रांवर आयोजित केली जाणार आहे.
परीक्षेसाठी सेंटर्स वाढवले
जेईई आणि नीट परीक्षांसाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यनिहाय सेंटर्सची लिस्ट घोषित केली आहे. शिक्षण मंत्रालयाकडून घोषित केलेल्या लिस्टमध्ये जेईई परीक्षेसाठी सेंटर्स 570 वरुन वाढवून 660 केले आहेत तर नीट परीक्षेसाठी सेंटर्स 2846 वरुन वाढवून 3843 केली आहेत.
जेईई मुख्य परीक्षेसाठी नंबर ऑफ शिफ्ट्सही वाढवल्या
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे की, जेईई परीक्षा एक ते 6 सप्टेंबर दरम्यान होईल आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. जेईई मुख्य परीक्षांसाठी नंबर ऑफ शिफ्ट्स देखील वाढवल्या आहेत. आधी या परीक्षेसाठी आठ शिफ्ट निश्चित केल्या होत्या. आता त्या वाढवून 12 केल्या आहेत.
कोरोनामुळे जेईई आणि नीट परीक्षा पुढे ढकला, सोनू सूदची मागणी
जेईई मुख्य परीक्षांसाठी अॅडमिट कार्ड देखील रिलिज करण्यात आली आहेत. नीट 2020 परीक्षांसाठी देखील अॅडमिट कार्ड या आठवड्यात रिलिज होण्याची शक्यता आहे. एनटीएकडून अॅडमिट कार्ड रिलिज करतेवेळी सांगण्यात आलं होतं की, जवळपास 99 टक्के विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेली परीक्षा केंद्रं देण्यात आली आहेत.
जेईई मेन्स आणि नीट परीक्षा 2020 टाळणं शक्य नाही असं नॅशनल टेस्टिंग एजन्सीने स्पष्ट केलं आहे. येत्या 13 सप्टेंबरला नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र अजूनही ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी केली जात आहे. मात्र आता कोणत्याही परिस्थितीत परीक्षा जास्त टाळू शकत नाही असं सरकारने स्पष्ट केलं आहे. एनटीएने परीक्षा सेंटर इत्यादींच्या बाबतीत आधीच विद्यार्थ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
सुप्रीम कोर्टाने कोरोना व्हायरस महामारीच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षा स्थगित करण्याची याचिका फेटाळली आहे. कोरोना व्हायरसच्या महामारीतही जनजीवन सुरु आहे. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या निर्णयामध्ये दखल देऊन विद्यार्थ्यांचं करिअर धोक्यात टाकणार नाही, असं कोर्टाने म्हटलं.
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नीट आणि जेईईच्या परीक्षांना दोनदा स्थगिती देण्यात आली आहे. आधी या परीक्षा मे महिन्यात नियोजित होत्या. त्यानंतर ही परीक्षा जुलै महिन्यात पार पडणार होती. मात्र कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्याने जुलै महिन्यातली परीक्षा सप्टेंबरमध्ये घेण्यात येणार आहे. आता जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर रोजी आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI