MPSC Exam : एमपीएससीची संयुक्त परीक्षा 4 सप्टेंबरला होणार; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची घोषणा
MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षेच्या आयोजनास परवानगी दिली आहे. ही परीक्षा 4 सप्टेंबरला होणार आहे.
MPSC Exam : एमपीएससीची संयुक्त पूर्वपरीक्षा आता 4 सप्टेंबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब'साठी ही परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र दुय्यम सेवा 'अराजपत्रित गट ब' संयुक्त पूर्वपरीक्षा 2020 ही परीक्षा आधी 11 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 9 एप्रिल रोजी एमपीएससीकडून परिपत्रक काढून ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता ही परीक्षा 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला आहे. याबाबत परिपत्रक काढून आयोगाने विद्यार्थ्यांना सूचित केले आहे. राज्य सरकारनं 3 ऑगस्ट 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून त्यांचा अभिप्राय कळवला होता.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई पुण्यासह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट–ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता हीच परीक्षा 4 सप्टेंबर रोजी घेतली जाणार आहे.
महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे.आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. तसेच, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील माहितीसाठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहनही केलं आहे.
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI