एक्स्प्लोर

MPSC Exam : आईच्या कष्टाचं लेकीने केलं चीज, एमपीएससी परीक्षेत संगमनेरच्या कल्याणीला मिळालं कष्टाचं फळ

MPSC Exam : घरची परिस्थिती बेताची असताना देखील संगमनेरच्या कल्याणीने जिद्दीने अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवलं. कल्याणीच्या या यशाने आईच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाला फळ मिळाले आहे.  

अमहमदनगर : बालवयातच वडिलांचं निधन झालं, घरची परिस्थीती हलाखीची, धुनी- भांडी करून आईनं मुलांच्या शिक्षणासाठी धडपड केली. आईच्या याच कष्टाचं अहमनगर जिल्ह्यातील संगमनेर ( Ahmednagar Sangamner) येथील कल्याणी आहिरे (Kalyani Ahire) या मुलीच्या याशाने फळ मिळालं आहे. कल्याणी हिने जिद्दीने एमपीएससी ( MPSC ) परीक्षेत यश मिळवत आईचं स्वप्न पूर्ण केलंय. कल्याणी आहिरे हिने वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळवलंय. सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता वर्ग एकच्या पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत कल्याणीने यश मिळवलय. ही परीक्षा तीन टप्प्यात पार पडली. यातील शेवटचा टप्पा मे 2022 मध्ये पार पडला आणि 12 ऑगस्ट 2022 रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला.  

संगमनेर शहरातील संजय गांधी नगर परिसरात झोपडीत अगदी पत्र्याच्या लहान घरात कल्याणी आपल्या आईसोबत राहते. तिच्या घरची परिस्थिती अगदी बेताची. लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं. घरची परिस्थिती हलाखीची असताना देखील आईने मुलांसाठी स्वप्न बघत त्यांना शिकविण्याचा निर्णय घेतला. दिवसा चार घरी धुनी भांडी आणि रात्री उशिरापर्यंत घरात मशीनवर ब्लाउज शिवण्याचं काम करत मुलांच्या संगोपनासाठी कल्याणीच्या आईने  प्रयत्न केले. घरची परिस्थिती बेताची असताना देखील कल्याणीने जिद्दीने अभ्यास केला आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेत यश मिळवलं. कल्याणीच्या या यशाने आईच्या आयुष्यभर केलेल्या कष्टाला फळ मिळाले आहे.  

कल्याणीने तिचे प्राथमिक  आणि माध्यमिक शिक्षण सिद्धार्थ विद्यालय या शिक्षण नगर परिषदेचेच्या शाळेतून पूर्ण केले. त्यानंतर बारावीपर्यंतचे शिक्षण ओहरा कनिष्ठ महाविद्यालयात आणि त्यानंतर अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात स्थापत्य अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून लागली. कल्याणीने लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून हे यश मिळवलंय. 

"मुलगी कल्याणी आणि मुलगा नवनाथ हे दोघेही लहानपणापासूनच शाळेत हुशार असल्याने दिवसभर धुनी-भांडी केल्यानंतर रात्री शिवणकाम असा माझा दिनक्रम अनेक वर्षापासून सुरू आहे. आज मुलीने मिळवलेले यश पाहून आनंद झाला असं सांगताना आई संगीता अहिरे यांना अश्रू अनावर झाले. यावेळी त्यांनी मुलांच्या लहानपणीच्या आठवणी सांगतांना गळा दाटून आला. आम्ही तिघे जण कॅमेरेचे ट्रायपॉड असून एकमेकांना कधी सोडत नाही, अशा भावना कल्याणीच्या आईने  एबीपी माझासोबत बोलताना व्यक्त केल्या.  

एकीकडे सगळ्या सुख सोयी असताना मुलांना यश मिळत नसताना दुसरीकडे घरातील हलाखीची परिस्थिती, स्पेशल क्लास नाही, राहायला एकच खोली या परिस्थितीत सुद्धा यश मिळू शकते हे कल्याणीने सिद्ध केलय.  

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवली, अधिसूचना जारी; ओमर अब्दुल्लांचं सरकार स्थापण होणार 
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, ओमरअब्दुल्लांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा 
Baba Siddiqui Murder Case :
"तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्यात, माफी मागा..."; भाजप नेत्याचा सलमान खानला सल्ला
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 25 हजार हेक्टरी बोनस मिळवून देणारManoj Jarange Yeola : मनोज जरांगेंच्या आवाहनानंतर येवल्यातील रास्तारोको मागेVidhan Sabha Election : आजची मंत्रिमंडळ बैठक ही आचारसंहिता लागू होण्याचीच चाहूलTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 14 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jammu and Kashmir : जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट उठवली, अधिसूचना जारी; ओमर अब्दुल्लांचं सरकार स्थापण होणार 
जम्मू काश्मीरमधील राष्ट्रपती राजवट रद्द, ओमरअब्दुल्लांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा 
Baba Siddiqui Murder Case :
"तुम्ही बिश्नोई समाजाच्या भावना दुखावल्यात, माफी मागा..."; भाजप नेत्याचा सलमान खानला सल्ला
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध; कोर्टाकडून 21 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी
सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नाहीच, ऑसिफिकेशन टेस्टनंतर सिद्ध
Astrology : आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
आज अमला योगासह बनले बनले अनेक शुभ योग; मिथुनसह 5 राशींना होणार मोठा लाभ, अनपेक्षित स्रोतांतून पैसे येणार
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
CSIR CASE परीक्षेमध्ये मोठा घोटाळा, यादीमध्ये कर्मचाऱ्यांच्या मुलांचा-नातेवाईकांचाच भरणा, नावांमध्येही गोंधळ घातल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
Baba Siddique Last Rite :भर पावसात बाबा सिद्दिकींनाअखेरचा निरोप
"माझं ऐकलं नाहीस, तर प्रायव्हेट VIDEO लीक करिन..."; आर्यन खान 'ब्लॅकमेल' करायचा, अनन्या पांडेचा धक्कादायक खुलासा
Health: 1 ग्लास वाइन प्यायल्याने कॅन्सरचा धोका? 'हे' संशोधन थक्क करणारं, आठवड्यातून नेमकं किती अल्कोहोल घेतलं पाहिजे?
Health: 1 ग्लास वाइन प्यायल्याने कॅन्सरचा धोका? 'हे' संशोधन थक्क करणारं, आठवड्यातून नेमकं किती अल्कोहोल घेतलं पाहिजे?
Embed widget